मुख्य बातम्या

पुणे ग्रामीण ATS ची धडक कारवाई; ‘पुष्पा’ स्टाईल चंदन तस्करीचे पुणे कनेक्शन उघड, २८ लाख रुपयांचा चंदनसाठा जप्त

शिरुर (तेजस फडके) पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुरंदर तालुक्यात मोठी कारवाई करत तब्बल २८ लाख रुपयांचा चंदनसाठा जप्त केला आहे. मांडकी (ता. पुरंदर) येथील पाटील वस्ती परिसरात शेतात लपवून ठेवलेले ५६० किलो वजनाचे चंदनाचे ओंडके पोलिसांनी हस्तगत केले असून, या कारवाईमुळे पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या चंदन तस्करीच्या रॅकेटची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. सोमवार (दि १८) मे रोजी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार पुणे ग्रामीण एटीएसचे पथक जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत संशयित आरोपींचा शोध घेत होते. 

दरम्यान, वाल्हे परिसरात पथकाला एका खबऱ्यामार्फत मांडकी येथील शेतात मोठ्या प्रमाणात चोरीचे चंदन लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएस आणि जेजुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विलास रावजी भोसले यांच्या शेतात छापा टाकला. शेतामध्ये हिरव्या कापडाखाली लपवून ठेवलेले चंदनाचे मोठे ओंडके पोलिसांना आढळून आले. या सोबतच झाडे कापण्यासाठी वापरण्यात येणारा बॅटरीवर चालणारा कटर आणि दोन लोखंडी ड्रिलही जप्त करण्यात आले. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची एकुण किंमत तब्बल २८ लाख ५ हजार २०० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे.

भाच्याने ठेवला चंदनसाठा; आरोपी फरार

शेतीमालक विलास भोसले यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, हा चंदनसाठा त्यांचा भाचा प्रतिक प्रमोद खुंटे (रा. मांडकी, ता. पुरंदर, जि. पुणे) याने ठेवला असल्याचे समोर आले. मात्र पोलिसांनी शोध घेतला असता आरोपी पसार झालेला आढळला.या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि भारतीय वन अधिनियम तसेच महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम मधील कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी प्रतिक खुंटे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सातारा जिल्ह्यात जबरी चोरीसह गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पुण्यातही “पुष्पा” गँग सक्रिय…?

दक्षिण भारतातील चंदन तस्करीवर आधारित Pushpa: The Rise चित्रपट देशभर गाजला होता. मात्र आता पुणे जिल्ह्यातही काही “पुष्पा” स्टाईल टोळ्या सक्रिय असल्याची चर्चा या कारवाईनंतर सुरु झाली आहे. पुरंदरातील कारवाई हि केवळ हिमनगाचे टोक असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. जिल्ह्यातील विविध भागात चंदन चोरी, जंगल परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोड आणि बाहेरील राज्यांमध्ये चंदनाची तस्करी करणारे नेटवर्क सक्रिय असल्याची शक्यता तपासली जात आहे.

मध्य प्रदेश दरोडा कटात, पुणे कनेक्शन…

या कारवाईमुळे सुमारे तीन महिन्यांपूर्वी घडलेली एक धक्कादायक घटना पुन्हा चर्चेत आली आहे. दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला परिसरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार रमेश करडे याने, यवत येथील आर्म ॲक्ट प्रकरणातील आरोपी फिरोज सय्यद याला सोबत घेऊन मध्य प्रदेशातील चंदन तेल कारखान्यावर दरोडा टाकण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली होती. सुत्रांच्या माहितीनुसार, दोघांनी पिस्टलचा धाक दाखवत चोरीचा प्रयत्न केला होता. मात्र मध्य प्रदेश पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडून दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. या घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील काही गुन्हेगारांचे चंदन तस्करीच्या आंतरराज्य रॅकेटशी संबंध असल्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

पोलिसांसमोर मोठे आव्हान

पुरंदरातील कारवाईनंतर आता पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे या तस्करीमागील संपूर्ण साखळी उघड करणे. चंदन नेमके कुठून आणले गेले…? त्याची विक्री कुठे होणार होती…? या रॅकेटमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत? याचा तपास आता वेगाने सुरु आहे. ग्रामीण भागातील शेत, गोदामे आणि जंगललगतच्या भागांचा वापर करून चंदनसाठा लपवला जात असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात अशा कारवायांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हि कारवाई पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे आणि एटीएसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, विशाल गव्हाणे, पोलीस हवालदार निलेश कदम, रविंद्र जाधव, पोलीस अंमलदार मोसीन शेख, ओंकार शिंदे, जालिंदर मुळीक तसेच जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक केशव जगताप यांचा समावेश होता. 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वाघाळे येथून भक्तिमय वातावरणात न्यू वाघेश्वर दिंडीचे आषाढी वारीसाठी प्रस्थान…

शिरूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात विठ्ठलनामाचा गजर सुरू असताना शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र वाघाळे…

9 तास ago

‘अजितदादांना मरणोत्तर पद्मविभूषण द्या’; मुख्यमंत्री फडणवीसांकडे राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

विधानसभा मुख्य प्रतोद चेतन तुपे यांचे निवेदन; महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे तातडीने शिफारस पाठवावी, अशी मागणी…

9 तास ago

एक तालुका – एक क्लस्टर’ योजनेला ब्रेक; राज्यातील १९१ तालुके अजूनही औद्योगिक विकासापासून वंचित; सत्यजीत तांबे

मुंबई: राज्यातील 'एक तालुका – एक क्लस्टर' योजनेची अंमलबजावणी संथ गतीने होत असल्याने महाराष्ट्रातील ३५५…

9 तास ago

पोलीस भरतीला वार्षिक कॅलेंडरची दिशा; सत्यजीत तांबे यांच्या मागणीला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

एमपीएससीप्रमाणे पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक तयार करण्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन मुंबई: राज्यातील लाखो…

9 तास ago

दादागिरी, खंडणी आणि धमक्यांना शून्य सहनशीलता; तक्रार करा, कठोर कारवाई करू – पीआय चंद्रशेखर यादव

शिक्रापूर पोलिसांची व्यापाऱ्यांसोबत समन्वय बैठक; वाहतूक, अतिक्रमण, पार्किंगसह सुरक्षेच्या प्रश्नांवर उपाययोजनांचे आश्वासन शिक्रापूर (अक्षय टेमगिरे):…

13 तास ago

कॅमेऱ्यासमोरील बडबड सोडा, मैदानात उतरून कर्तृत्व दाखवा; विरोधकांवर शिवसेनेचा निशाणा

मुंबई: विरोधकांनी कॅमेऱ्यांसमोर आक्रमक आणि अर्वाच्य भाषा वापरण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे…

13 तास ago