मुख्य बातम्या

किराणा दुकानात चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराकडुन चौकशीत अजून तीन गुन्हे उघडकीस

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनेसांगवी येथील एका किराणा दुकानात सुमारे 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन फरार झालेल्या विजय लक्ष्मण गलांडे (वय 31 वर्षे) रा.सासवडरोड, गोंधळेनगर, हडपसर, पुणे सध्या रा. पेरणेफाटा, ता. हवेली, जि. पुणे या आरोपीला पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडुन चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. तपासा दरम्यान त्याने वेगवेगळ्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत अजुन तीन गुन्हे केल्याची कबुली दिली असल्याचे तपास अधिकारी सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनेसांगवी (ता. शिरुर) येथे रविंद्र गंगाराम डांगे यांचे जय मल्हार ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान असुन (दि. 19) मार्च रोजी रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने शटर उचकटुन दुकानातील 65 हजार 500 रुपये किंमतीचा किराणा माल चोरुन नेला होता. याबाबत रविंद्र डांगे यांच्या फिर्यादीवरुन (दि 20) मार्च रोजी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुध्द घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयाचा तपास करण्याबाबत रांजणगाव MIDC चे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी तपास पथकातील पोलिसांना सुचना दिल्यानंतर तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ, पोलिस हवालदार वैभव मोरे यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत परिसरातील CCTV कॅमेरे चेक करुन तांत्रिक विश्लेषण करुन आरोपीस तात्काळ अटक केली होती. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता. त्याने वाकड पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक चारचाकी तवेरा गाडी, खडकी पोलिस स्टेशनच्या हद्दीत 23 मोकळे गॅस सिलेंडर आणि हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक मोटार सायकल चोरली असल्याची कबुली दिली असल्याचे तपास अधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापुर पोलिसांचा बीडमध्ये छापा; साडेचार लाखांचे दागिने हस्तगत, एक आरोपी गजाआड

शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…

10 तास ago

सहकार वाचवण्याचे मोठे आव्हान; सत्ताधारी सहकाराचे नाही तर ‘स्वाहाकाराचे’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…

11 तास ago

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

1 दिवस ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

1 दिवस ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

1 दिवस ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

1 दिवस ago