मुख्य बातम्या

Video; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार-आमदार गप्प का…? रांजणगाव गणपतीत लागले फलक…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक चिघळत असताना, रांजणगाव गणपती येथे लागलेल्या फलकांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. रांजणगाव बसस्थानक परिसर व महागणपती मंदिराजवळ लावलेल्या फलकांमध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे तसेच आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली ठाम भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा मतदारसंघात आपल्या विरोधात तीव्र निषेध होईल, असा बॅनर लावुन इशारा देण्यात आला आहे.

सध्या मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु असून, मराठा समाजाच्या हक्कासाठी हजारो समाजबांधव तळ ठोकून बसले आहेत. अनेक आमदार-खासदार उपोषणस्थळी हजेरी लावून आपली भूमिका जाहीर करीत आहेत. परंतु काही लोकप्रतिनिधी गप्प बसल्याने त्यांच्या मतदारसंघात असंतोषाची ठिणगी पडू लागली आहे.

रांजणगावातील या फलकामुळे स्थानिक पातळीवरही वातावरण पेटू लागले आहे. आरक्षणाच्या लढ्यात जनतेला आपल्या प्रतिनिधींनी स्पष्ट भूमिका घ्यावी, असे स्पष्ट संकेत समाजातून मिळत आहेत. “जनतेच्या प्रश्नावर मौन धरणाऱ्या नेत्यांना मतदारसंघ माफ करणार नाही,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत.

मराठा आरक्षणावर आता राजकीय नेत्यांची कसोटी लागली असून, रांजणगाव गणपतीत लागलेले फलक हीच त्याची सुरुवात असल्याचे चित्र दिसत आहे.

Video; रांजणगाव महागणपती चरणी मराठा आरक्षणासाठी प्रार्थना

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

1 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

1 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

1 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

1 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

1 दिवस ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

2 दिवस ago