मुख्य बातम्या

शिक्रापुरचे पोलिस कर्मचारी ‘खत्री’ यांच्या भांडाफोडने ‘खुना’ ची उकल होणार का…? वरीष्ठांच्या तपासावर प्रश्नचिन्ह…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुर पोलिस स्टेशनमधील बहुचर्चित खुन प्रकरणाची आता वरीष्ठांनी दखल घेतल्याने तपासाच्या हालचाली वेगाने सुरु झाल्याची ‘खात्री ‘ लायक सुत्रांनी माहिती दिली आहे. गेल्या दहा महिन्यापासुन या खुनाच्या तपासाबाबत ‘खत्री’ या पोलिस कर्मचाऱ्याने वरीष्ठांकडे तक्रारी अर्ज करुनही तपासाची सुत्रे हलवली जात नव्हती. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

पोलिस स्टेशन मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सगंनमताने ‘आर्थिक तडजोड’ करत हा खुन पचवण्याचा धक्कादायक प्रकार शिक्रापुर पोलिस स्टेशनमध्ये घडला असल्याची दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा आहे. त्याच पोलिस स्टेशनमधील एका ‘खत्री’ नावाच्या पोलिस कर्मचाऱ्यानेच या कथित खुनाच्या भांडाफोड केल्याने वरिष्ठांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. आर्थिक लाभासाठी चक्क कथित खुन प्रकरण दाबले जात असुन यात काही कर्मचाऱ्यांचे ‘दांडगे’ कनेक्शन असल्याचीही चर्चा सगळीकडे जोर धरु लागली आहे.

 

शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत चालणाऱ्या अनेक अवैध व्यवसायातुन मिळणारी ‘लाखो’ रुपयांची माया या आधिकाऱ्याला कमी पडत असल्यामुळेचं पैशासाठी चक्क एक ‘खुना’ चे प्रकरण पचवायला हे अधिकारी तयार झाले होते. पण ‘खत्री’ नावाच्या कर्मचाऱ्याच्या रुपाने त्यांना ‘खतरा’ निर्माण झाला असुन या कथित खुनाचा उलगडा करणे क्रमप्राप्त झाले आहे.

 

तसेच एका हापमर्डरमधील गुन्ह्यातील आरोपीला तो पोलिस स्टेशनमध्ये आलेला असतानाही त्याला अटक न करता अटकपुर्वक जामीन होण्यासाठी या अधिकाऱ्याने मदत केली आहे. तसेच कलम ३२४ मधील आरोपी महिलेला तातडीने अटक करुन तुरुंगात डांबले होते. त्यानंतर हि बाब कोर्टाच्या निदर्शनास आल्यावर कोर्टाने व पोलिस अधिक्षकांनी शिक्रापुर पोलिसांना चांगलेच धारेवर धरल्याचीही दबक्या आवाजात सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे.

 

या घटनेला तब्बल दहा महीने होऊनही खुनाचा तपास का होऊ शकला नाही आणि यात कोण कोण सामील आहे. याची शहानिशा करुन पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षकांनी तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच आर्थिक तडजोड केल्यावर दिल्यावर काहिही करता येते याच उत्तम उदाहरण म्हणजे शिक्रापुर पोलिस स्टेशन आहे का…? असाही सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

 

शिक्रापुर व सणसवाडीच्या गुटख्याची तालुकाभर विक्री…

याच पोलिस निरीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली कलेक्शन बहाद्दरामार्फत शिक्रापुरात खुलेआम होलसेल गुटख्याची विक्री गेल्या कित्येक वर्षापासून सुरु आहे. शिक्रापुर येथुन तालुक्यात होलसेलमध्ये मोठया प्रमाणात गुटखा विक्री होत आहे. तसेच मटका, जुगार अवैध दारुविक्री जोरात सुरु असुन महिन्याकाठी लाखो रुपयांची वसुली सुरु आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक आणि शिरुरचे विभागीय पोलिस अधिकारी, पोलिस अधिक्षक यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

 

शिरुरचे उपविभागीय अधिकाऱ्यांचे मौन…? 

या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पोलीस शिरुर उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. आता या खुन प्रकरणी पोलिस अधिक्षक काय भुमिका घेतात…? वरीष्ठांच्या भ्रष्टाचाराची भांडाभोड केल्या प्रकरणी पोलिस कर्मचारी ‘खत्री’ ला आता काय बक्षिस मिळणार याकडे शिरुर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

धक्कादायक; खुनाच्या आरोपीला आर्थिक तडजोड करत वाचवण्याचा शिक्रापूरच्या पोलिस अधिकाऱ्याचा प्रयत्न…?

शिक्रापुरच्या त्या ‘दिप’ रतनचा खाकी वर्दीला काळीमा फासणारा लाजिरवाना पराक्रम…?

शिरूरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्याला तलवार लावून लुटणाऱ्याला शिरूर पोलिसांनी केले जेरबंद

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

6 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

6 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

6 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

21 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago