मुख्य बातम्या

दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम एकाच मंचावर अन् निकम यांचे केले कौतुक…

मंचर : आंबेगाव-शिरूर विधानसभा निवडणूक एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवलेले कट्टर विरोधक माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व देवदत्त निकम हे एकाच मंचावर पाहावयास मिळाले. विशेषत: यावेळी वळसे पाटील यांनी निकम व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून यात्रेचे चांगले नियोजन केले आहे, असे वक्‍तव्य केले. दिलीप वळसे पाटील व देवदत्त निकम देवाच्या यात्रेनिमित्त अनेक दिवसानंतर एकाच मंचावर दिसल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या असून मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहेत.

राजकारणात कुणीही कुणाचा दीर्घकाळ शत्रू नसतो किंवा मित्र नसतो असे नेहमीच बोलले जाते याचाच प्रत्यय सोमवारी (ता. १३) आंबेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र थापलिंग येथील यात्रेत आला.

देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटील यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात. पूर्वी एकाच पक्षात काम करणारे गुरु, शिष्य आता राष्ट्रवादी पक्षात फूट पडलेल्या दोन वेगवेगळ्या गटात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक असताना दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासून देवदत्त निकम यांनी पक्षात काम केले आहे. त्यानंतर वळसे पाटील यांच्या माध्यमातून निकम यांना विविध पदांवर काम करण्याची संधी देखील मिळाली आहे. दरम्यानच्या काळात स्थानिक बाजार समिती निवडणुकीत झालेला वाद व त्यातून वळसे पाटील व निकम यांच्यात निर्माण झालेली दरी व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेले दोन गट यामुळे वळसे पाटील व निकम हे एकमेकांचे कट्टर विरोधक झाले.

वळसे पाटील अजित पवार गटात तर देवदत्त निकम हे शरद पवार गटात कार्यरत असल्याने पक्षाच्या विविध कार्यक्रमात एकमेकांवर जोरदार टीका केली जात होती. काही दिवसापूर्वीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील व देवदत्त निकम हे एकमेकांच्या विरोधात उभे होते. त्यावेळी निकम व वळसे पाटील यांनी एकमेकांवर जोरदार टीकाटिप्पणी केली होती. तसेच दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते देखील एकमेकांना भिडले होते. वळसे पाटील कुटुंबाचे श्रीक्षेत्र थापलिंग हे कुलदैवत असल्याने वळसे पाटील अगदी लहानपणापासून दरवर्षी श्रीक्षेत्र थापलिंग देवाच्या दर्शनाला येत असतात. यावर्षी त्यांनी देवाच्या दर्शनाला येत घाटामध्ये नवसाचे बैलगाडे पाहण्याचा आनंद घेतला.

यावेळी वळसे पाटील यांनी आपल्या भाषणात श्रीक्षेत्र थापलिंग गडावरील नियोजित खंडोबा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या भाग विकास निधीतून पहिला टप्प्यात २५ लाख रुपये आणि दुसरा टप्प्यात २५ लाख असे एकूण, ५० लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी वळसे पाटलांनी निधी देणार असल्याची घोषणा करतात उपस्थित बैलगाडा शौकिनांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनीही टाळ्या वाजवून वळसे पाटलांनी कारखान्याच्या माध्यमातून देऊ केलेल्या निधी घोषणेचे स्वागत करून एक प्रकारे त्यांचे आभार मानल्याचे दिसून आले. पण, चर्चा झाली ती दोन नेते एकाच मंचावर आल्याची.

विजय मिळालाय पण मी लाजत लाजत फिरतोय: दिलीप वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांचे विरोधकांना प्रत्युत्तर…

दिलीप वळसे पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट; निवडीविषयी म्हणाले…

Live Video: दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ रांजणगावमध्ये महिला निर्धार मेळावा; पाहा कोण काय म्हणाले…

आंबेगाव-शिरूर मतदार संघातून दिलीप वळसे-पाटील विजयी

आंबेगाव-शिरूर विधानसभा निवडणूकीचा Live निकाल…

शिरूर-हवेली विधानसभा निवडणूकीचा Live निकाल…

…तर मी उमेदवारी मागे घेईनः दिलीप वळसे पाटील

शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावात किती मतदान झाले; पाहा सविस्तर आकडेवारी…

Video: दिलीप वळसे पाटील यांची साथ सोडण्याचे शेखर पाचुंदकर यांनी सांगितले मुख्य कारण…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

10 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

10 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago