आरोग्य

स्वयंपाकघरातील ५ मसाले आहेत जादुई, झरझर वाढणारी शुगर – ब्लडप्रेशर आणतील आटोक्यात

मधुमेह हा जीवनशैली संबंधित गंभीर आजार आहे. जगभरात ९० टक्के रुग्ण मधुमेहाने ग्रस्त आहेत. सध्या त्याच्या प्रकरणात देखील वाढ होत आहे. यामध्ये शरीर योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करु शकत नाही. यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा अधिक राहाते. अनेकदा हा आजार अनुंवाशिकतेमुळे देखील होतो.

आहार आणि जीवनशैलीत काही बदल करुन यावर आपल्याला मात करता येते. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक मसाले आहे. जे खाल्ल्याने मधुमेह नियंत्रित करण्यास मदत होईल. याविषयीची माहिती आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी दिली. मसाल्यांचा आरोग्यासाठी कसा फायदा होतो जाणून घेऊया.

या मसाल्यांमुळे मधुमेह येईल आटोक्यात

मेथीच्या दाण्यात फायबर असते. हे शरीरातील कार्बोहायड्रेट्स आणि गॅलेक्टोमनन असते ज्यामुळे साखरेचे प्रमाण कमी करते. यामुळे इन्सुलिन सुधारते.

तेजपत्त्यामध्ये रक्तातील साखर कमी करणारे घटक असतात. यामुळे ग्लुकोज नियंत्रणात होऊन चयापचय सुधारते. हे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

दालचिनीमध्ये अँटी-बायोटिक, अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात. तसेच शरीरातील इन्सुलिन स्राव होण्यास मदत करते. धणे आणि लवंगमध्ये कार्बोहायड्रेट चयापचय सुधारण्याचे घटक असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुरळीत राहाते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी खास चहा

साहित्य

मेथी दाणे – अर्धा चमचा

तेजपत्ता – १

दालचिनी – १

धणे – १ चमचा

लवंग – १ चमचा

पाणी – १ ग्लास

कृती

सगळ्यात आधी १ ग्लास पाणी घेऊन उकळत ठेवा. त्यात वरील सर्व साहित्य घालून उकळून घ्या. गाळून कोमट झाल्यानंतर दिवसातून एकदा प्या. यामुळे शरीरातील डिटॉक्स बाहेर पडेल आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहिल. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी हे मसाले मदत करु शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago