आरोग्य

कमी वयातच वेगवेगळे आजार मागे लावणाऱ्या ६ गोष्टी, बघा तुमचही काही चुकतय का

हल्ली आपण आजुबाजुला पाहातच आहोत आणि कित्येक जण स्वत:च्या अनुभवातूनही हे लक्षात घेत आहेत की सध्याच्या काळात कमी वयातच वेगवेगळे आजार मागे लागत आहेत.

बीपी, मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार, लठ्ठपणा, विस्मरण, पाठदुखी, गुडघेदुखी, केस पांढरे हाेणं, थकवा येणं असे कित्येक त्रास हल्ली कमी वयातच मागे लागत आहेत. यासाठी अशा काही गोष्टी जबाबदार आहेत ज्या आपण रोजच्यारोज करतो आणि वेगवेगळे आजार स्वत:हून आपल्याकडे ओढून घेतो.

कमी वयातच अशी वेगवेगळी दुखणी मागे लागून घ्यायची नसतील तर कोणत्या गोष्टी करणं टाळायला हवं.

यामध्ये त्यांनी सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे झोपेच्या बाबतीत तडजोड नको. दररोजच रात्री तुमची अपुरी झोप होत असेल तर ते टाळा आणि ८ तासांची पूर्ण झोप घ्या.

वेळ नाही म्हणून किंवा इतर कोणत्या कारणांमुळे नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण घेण्यात टाळाटाळ करू नका. या तीन जेवणांच्या वेळा अगदी कटाक्षाने पाळा.

खूप जास्त व्यायाम करणे किंवा अजिबातच व्यायाम न करणे या दोन्ही गोष्टी टाळायला हव्या. दररोज अर्धा ते पाऊण तास व्यायाम नियमितपणे करा.

कामाच्या वेळाही नियंत्रित ठेवा. काही जणांना १२- १३ तास सलग बसून काम करावे लागते. एवढे जास्त काम करणे तुम्हाला मानसिक आणि शारिरीक दृष्टीने थकवणारे ठरते.

सतत ताण घेऊन जगू नका. दररोज १५ मिनिटे मेडिटेशन करा. यामुळे मन शांत होते. मनाची मरगळ, डिप्रेशन, एन्झायटी हा सगळा त्रास कमी होऊन रिलॅक्स वाटते. मन शांत झालं की आपोआपच शरीरही थोडे रिलॅक्स होते.

नवं काहीतरी सतत वाचत राहा. यामुळे डोक्यालाही चालना मिळते. थोडा विरंगुळा मिळाला तर शरीर आणि मन ताजेतवाणे होऊन अधिक जोमात काम करते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाचे आकांडतांडव; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

मोदी-शाह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल वापरलेल्या भाषेची आठवण करून देत सपकाळांचा भाजपावर निशाणा मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

11 तास ago

शेतकऱ्यांना नडाल तर तुरुंगात पाठवू! सक्तीच्या कर्जवसुलीवर एकनाथ शिंदेंचा इशारा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने…

11 तास ago

दुष्काळ निवारणासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन; शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली खपवून घेणार नाही!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही घेतला आढावा नाशिक : राज्यातील दुष्काळी…

11 तास ago

‘स्थगितीवाले नाही, तर प्रगतीवाले आहोत!’; सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा कायापालट होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गंगापूर रस्त्याचे भूमिपूजन; अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन नाशिक: पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून…

11 तास ago

शिरूर पोलिसांची अवैध दारु विक्रीवर कारवाई; दोन ठिकाणी छापा टाकत मुद्देमाल जप्त…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्री विरोधात पोलिसांनी जोरदार कारवाया सुरु केल्या असुन…

18 तास ago

बाभुळसर-करडे अष्टविनायक महामार्गावर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : एका गैरसमजातून झालेल्या वादातून तरुणाला लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केल्याची…

18 तास ago