लहान मुलांचे कान टोचणे हा आपल्याकडे पारंपरिक आणि संस्कृतीचा भाग असला तरी, यात बाळाची काळजी घेणे आवश्यक असते. लहान बाळाचे कान टोचताना जरा चुकीची पद्धत किंवा दुर्लक्ष झाल्यास बाळाला संसर्ग, वेदना किंवा इतर गंभीर समस्या होऊ शकतात. यासाठीच, बाळाचे कान टोचण्यापूर्वी डॉक्टर सांगतात त्या महत्वाच्या ६ गोष्टी कोणत्या ते पाहूयात.
थोडासा निष्काळजीपणा झाला तर ही प्रक्रिया मुलांसाठी वेदनादायक ठरू नये साठी काय करावे
१) 6 महिन्यांनंतर बाळाची प्रतिकारकशक्ती वाढलेली असते आणि कानाची पाळी देखील थोडी मोठी व मजबूत झालेली असते. त्यामुळे हा काळ बाळाचे कान टोचण्यासाठी सर्वात योग्य मानला जातो.
२. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर आपल्याला ६ महिन्यांपूर्वीच बाळाचे कान टोचायचे असतील तर किमान बाळाचे १४ आठवडे म्हणजेच साडेतीन महिन्यांपर्यंतचे लसीकरण पूर्ण झालेलं असावं, तेव्हाच कान टोचावे.
३. कान टोचण्यापूर्वी पालकांनी विशेष काळजी घ्यावी की, जेव्हा बाळाचे कान टोचणार असाल तेव्हा बाळ पूर्णपणे निरोगी असावं. बाळाला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन नसावं.
४. तुम्ही जर सोनाराकडून कान टोचण्याचा विचार करत असाल, तर त्यांनी या कामात प्रशिक्षण घेतलं आहे का आणि प्रक्रिया पूर्णपणे स्वच्छ व सुरक्षित पद्धतीनं होते का, हे नक्की तपासा.
५) कान टोचण्यापूर्वी सुमारे अर्धा तास आधी बाळाच्या कानावर नबिंग क्रीम किंवा आइस पॅक लावा, ज्यामुळे वेदना कमी होतील आणि बाळाला आरामदायक वाटेल.
६) बाळाचे कान टोचल्यानंतर, कानांत घालण्यासाठी फक्त सर्जिकल स्टील किंवा सोन्याचेच कानातलेच वापरावेत. या धातूंमुळे अॅलर्जी किंवा त्वचेवर कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होण्याचा धोका कमी असतो, त्यामुळे हे दोन्ही धातू बाळाच्या नाजूक त्वचेसाठी सुरक्षित मानले जातात.
(सोशल मीडियावरून साभार)