आरोग्य

लिंबाच्या सालीचे फायदे

लिंबाप्रमाणेच त्याची सालही फायदेशीर असते. लिंबाची साल फेकून देण्याची चूक करू नका. जाणून घेऊया लिंबाच्या सालीचे फायदे.

लिंबाच्या सालीत व्हिटॉमिन ए, सी, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर यांसारखे अनेक पोषकघटक असतात. लिंबाची सालही लिंबू पाण्यापेक्षा अधिक उपयुक्त असते.

लिंबाच्या सालीत कॅल्शियम आणि व्हिटॉमिन-सी भरपूर असल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.

लिंबाच्या सालीच्या वापरामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यात असलेल्या अँटी ऑक्सीडेंटमुळे स्किन कॅन्सरला प्रतिबंध होण्यास मदत होते.

व्हिटॉमिन-सी त्वचेसाठी अत्यंत गरजेचे आहे. लिंबाच्या सालीत ते भरपूर प्रमाणात असते. याच्या वापरामुळे त्वचेचा कॅन्सर, हृदयाचे आजार दूर होण्यास मदत होते.

लिंबाच्या सालीत असलेल्या मिनरल्समुळे पचनक्रिया सुधारते. त्यामुळे पचन अधिक चांगल्या प्रकारे होते आणि परिणामी अनेक आजारांपासून सुटका मिळते.

तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीवर लिंबाची साल फायदेशीर ठरते.

लिंबाच्या सालीमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. जर रक्तदाब नियंत्रित असेल तर हृदयासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होते.

मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी लिंबाची साल उपयुक्त ठरते.

ताण दूर करण्यास लिंबाच्या सालीची मदत होते. यात काही प्रमाणात फ्लेवानॉयड असते. त्यामुळे ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस दूर होतो.

लिंबाच्या सेवनाने लिव्हर साफ होण्यास मदत होते. रक्ताभिसण चांगले होते.

पदार्थांची चव वाढवण्यासाठी जेवणात हमखास लिंबाचा वापर होतो. हे संत्री आणि मोसंबी प्रमाणे एक साइट्रस फळ आहे. नेहमी आपण लिंबाचा रस वापरतो आणि त्याची साल फेकुन देतो. मात्र, लिंबाच्या रसा इतकीच लिंबाची साल देखील गुणकारी आहे. लिंबात बायोएक्टिव्हचे प्रमाण जास्त असते, जे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. लिंबाच्या सालीत फायबर आणि क जीवनसत्त मोठ्या प्रमाणात असते. एवढंच नाही तर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम देखील मोठ्या प्रमाणात असतात.

लिंबाच्या सालीचे अन्य फायदे

लिंबाच्या सालीचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. जर रोज एक ते दोन ग्रॅम क जीवनसत्त्वाचे सेवन केले तर व्हायरल ताप आणि सर्दी होण्याची शक्यता ही ८% ने कमी होते.

अनेकदा जेवण्याच्या भांड्याला आतून चिवटपणा राहतो. साबणाने देखील हा चिवटपण जात नाही. एखादा पदार्थ करपला की भांड्याच्या तळाला डाग राहतात, अशा वेळी लिंबाच्या सालीने भांडी घासली की चिवटपणा लगेच निघून जातो.

कुकर मध्ये भात शिजवताना कुकर आतून काळा पडतो, अशा वेळी खाली पाण्यासोबत लिंबाची एक साल ठेवावी, सालीमुळे कुकर आतून काळा होत नाही.

चहा किंवा कॉफी तयार करताना भांड्यावर येणारा काळा थर काढण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर होऊ शकतो.

फ्रिजमध्ये जर दुर्गंध येत असेल तर दोन तीन लिंबाच्या साली ठेवाव्या, दुर्गंधी लगेच दूर होते.

घरात मुंग्या येत असतील तर त्या जिथून येतात तिथे लिंबाची साल ठेवावी. मुंग्या किंवा इतर छोट्या कीटकांचा त्रास कमी होतो

लिंबाची साल पाय किंवा हातांच्या बोटावर अलगद फिरवल्यास नखं तर स्वच्छ होतातच, पण नखांवर एक वेगळीच चमक देखील येते.

ढोपर किंवा हाताचे कोपरे काळवंडले असतील तर त्या ठिकाणी लिंबाच्या सालीने मसाज केल्यास त्वचा उजळते.

अर्ध्या कापलेल्या लिंबात ५-६ लवंग टोचावे आणि झोपताना जवळपास ठेवावे, त्यामळे डास येणार नाहीत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

14 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

14 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

14 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

18 तास ago