सर्वात श्रेष्ठ अशी चार आसने आहे, ती म्हणजे सिम्हमुद्रा, भद्रासन, पद्मासन आणि सिद्धासन. यातील भद्रासन हे शरीराला तणाव देणाऱ्या आणि पायांची नसे खेचणाऱ्या आसना पैकी एक महत्त्वाचे आसन आहे.
सर्वप्रथम दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवून बसावे. पाठीचा कणा सरळ ताठ ठेवावा. त्यानंतर दोन्ही पाय दुमडून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जुळवून ठेवावे आणि दोन्ही पाय हळूहळू आपल्या जवळ खेचावे. हातांची बोटे एकमेकांत गुंफून हातांच्या ओंजळीने पावले घट्ट पकडून ठेवावी. जेणे करून पावले पुढे सरकून पकड आणि मांड्यांवरचा तणाव ढीला पडणार नाही आणि मांड्यांच्या नसांना चांगल्या प्रकारे ताण मिळू शकेल.
पायाचे तळवे जास्तीत जास्त जवळ घ्यावेत. थोडावेळ मन शांत करून स्थिर बसावे. त्या नंतर फुलपाखरू जसे आपले पंख फडफडविते त्याप्रमाणे मांड्या वर-खाली कराव्यात. आसनाचे नाव जरी भद्रासन असले तरी या क्रियेमुळे याला ‘बटरफ्लाय पोज’ असेही म्हणतात. थोड्या वेळानंतर मांड्या स्थिर कराव्यात. नमस्कार करावा आणि हात पर्वतासन प्रमाणे उंच खेचून ठेवावेत. डोळे बंद करावेत.
भ्रूमध्यामध्ये ध्यान करावे. दीर्घ श्वसन करून ओंकार उच्चार करावा आणि त्यानंतर पाठीचा कणा शक्य तितका ताठ ठेवून सावकाशपणे खाली वाकावे आणि कपाळ जमिनीला लावायचा प्रयत्न करावा. हात पुढे सोडावेत. हळूहळू खाली वाकून हाताची कोपरे सर्वप्रथम जमिनीला लावायचा प्रयत्न करावा. या संपूर्ण क्रिये मध्ये पायांतील मुख्यत्वे मांडीच्या नसांना अतिशय चांगला तणाव मिळतो. त्यामुळे थोडी वेदना पायाच्या मांड्यांमध्ये आणि शिवणी मध्ये होऊ शकते. ती वेदना सहन करावी. मन शांत ठेवावे. उच्छ्वासा बरोबर आणखी खाली वाकायचा प्रयत्न करावा. हळूहळू खाली वाकून कपाळ जमिनीला लावावे. शक्य झाल्यास हनुवटी जमिनीला लावावी. या आसनाला भद्रासन असे म्हणतात. हे आसन करावयास कठीण असल्यामुळे या आसनाला ‘गोरक्षासन’ असेही म्हटले आहे. काहीजण या आसनाला ‘बद्धकोण’ आसन या नावानेही ओळखतात. प्राचीन काळामध्ये या आसनाला काही ठिकाणी ‘ब्रह्मचर्यासन’ असेही म्हणतात.
भद्रासन मध्ये मांड्यांमधून गेलेल्या नसांना अतिशय उत्तम ताण मिळतो. पाठीचा कणा आणि कंबरेला चांगला ताण मिळतो. शरीरामध्ये लवचिकता येते. हा ताण मिळाल्यामुळे मन शांत, स्थिर होते. या आसनामुळे शरीरातील अनेक नाड्यांची शुद्धी होते आणि अनेक प्रकारचे रोग दूर होतात. या आसनाच्या अभ्यासामुळे मनाला येणारा थकवा दूर होतो. या आसनामध्ये मूलबंध साधला जातो. याचा थेट परिणाम हा सप्ताचक्रांतील मूलाधार चक्रावर होतो. हे चक्र आपले गुदद्वार आणि जननेंद्रिय यांच्या मध्ये असलेल्या शिवणीच्या थोडे वर असते. मनोव्यापार आणि त्यातील तरंगांचे उगमस्थान मूलाधार चक्रातून आहे. भद्रासनाच्या अभ्यासाने मन स्थिर, एकाग्र होते, तसेच चित्तवृत्ती नियंत्रित होते.
(सोशल मीडियावरून साभार)
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…