महाराष्ट्र

शेतकऱ्यांना फक्त ७ दिवसांत मिळणार हक्काचा शेतरस्ता जाणून घ्या महसूल विभागाचा नवा आदेश

औरंगाबाद: शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठीचा रस्ता मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे तहसील कार्यालयांचे फेरे मारावे लागत होते. आदेश निघूनही अंमलबजावणी होत नव्हती. पण आता हा त्रास संपणार आहे.

महसूल विभागाचा नवा निर्णय

तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी आता फक्त ७ दिवसांत करावी लागेल.

रस्ता मोकळा केल्यानंतर जिओ-टॅग फोटो अपलोड करणे बंधनकारक असेल.

प्रत्येक शेतात जाण्यासाठी किमान १२ फूट रुंदीचा रस्ता देणे अनिवार्य.

जिओ टॅग फोटो अनिवार्य

आता कोणत्या जागेवर रस्ता दिला गेला, किती रुंदीचा आहे आणि अंमलबजावणी खरोखर झाली का हे सर्व पुरावे फोटोद्वारे सिद्ध करावे लागतील. त्यामुळे खोट्या अहवालांना आळा बसणार आहे.

शेत आणि वहिवाटीचे रस्ते मोकळे होणार

अनेक ठिकाणी जुन्या शेतरस्त्यांवर अतिक्रमण झाले होते.

आता महसूल विभागाने आदेश देऊन हे रस्ते सात दिवसांत मोकळे करण्याची जबाबदारी तहसील अधिकाऱ्यांवर टाकली आहे.

पंचनामा, नकाशा, फोटो आणि साक्षीदार यांच्या सहीसह संपूर्ण दस्तऐवजीकरण आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

वर्षानुवर्षे अडकलेले रस्त्यांचे वाद आता सुटणार.

शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कायदेशीर आणि सुरक्षित रस्ता मिळणार.

महसूल कार्यालयांवरील अवलंब कमी होईल आणि पारदर्शकता वाढेल.

स्थळ पाहणी व पंचनामा बंधनकारक

तलाठी, मंडळ अधिकारी आणि महसूल निरीक्षकांनी मिळून

स्थळ पाहणी

रस्त्याची रुंदी, दिशा, अतिक्रमण आणि प्रवेशाची नोंद

साक्षीदारांच्या सहीसह पंचनामा तयार करणे बंधनकारक आहे.

प्रकरण ‘बंद’ करण्यावर बंदी

पूर्वी अंमलबजावणी न करता प्रकरण ‘बंद’ करण्यात येत होते.

आता मात्र आदेश पूर्णपणे अमलात आल्यानंतरच प्रकरण निकाली लागले असे मानले जाईल. संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल.

७ दिवसांत अंमलबजावणी – नाहीतर कारवाई

तहसीलदारांनी दिलेला आदेश आता ७ दिवसांतच प्रत्यक्ष स्थळावर अमलात आणावा लागेल.

वरिष्ठ अधिकारी तपासणी करून खात्री करतील की आदेश फक्त कागदावर नाही, तर प्रत्यक्षात झाला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. आता रस्त्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागणार नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

3 मिनिटे ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

4 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

4 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

4 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

4 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

4 तास ago