आलं आरोग्यासाठी फार चांगलं असतं. हे आपल्याला माहिती आहेच. आहारामध्ये आल्याचा समावेश असणे फार फायद्याचे ठरते. भाजीत, आमटीत सगळ्यात आलं आपण घालतो. आल्याचा काढा तसेच आल्याचा चहा आरोग्यासाठी फार चांगला.
पण कधी सुंठ वापरता का
आले वाळवून त्याची सुंठ तयार केली जाते. ही सुंठ आल्यापेक्षा जास्त आरोग्यदायी असते. अनेकदृष्ट्या उपयुक्त ठरणारी सुंठ पावसाळ्यात तर घरी वापरायलाच हवी.
पावसाळ्यात आल्याचा चहा तर पिताच मात्र सुंठीचा छान कडक चहा पावसाळ्यात पिणे फार फायद्याचे ठरेल. सर्दी खोकला ताप पावसाळ्यात नुसता थैमान घालतात. सुंठीचा चहा प्यायल्याने आजार आटोक्यात राहतात.
सुंठ उगाळून त्याचा लेप तयार करता येतो. हा लेप फार उपयुक्त असतो. अगदी गुणकारी असतो. त्यामुळे तो वापरणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल. पाहा किती फायदे असतात.
सुंठीत अँण्टी इन्फ्लेमेटरी घटक असतात. ते वेदनाशामक असतात. त्यामुळे सुंठीचा लेप लावल्यामुळे हात, मान दुखत असल्यास आराम मिळतो. हा लेप स्नायूंसाठी फार उपयुक्त ठरतो.
वाताचा त्रास अनेकांना असतो. वातामुळे डोके दुखते. तसेच इतरही अनेक त्रास होतात. सुंठीचा लेप वात खेचून घेतो. तसेच पित्ताचा त्रास होत असेल तरी हा लेप डोकेदुखी थांबवण्यात मदत करतो.
सुंठीच्या लेपामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. प्राणवायु शरीराला जास्त मिळतो आणि त्यामुळे थकवा जास्त जाणवत नाही. त्यामुळे सर्दीने नाक बंद झाल्यावर असा लेप लावायचा. नाक सुटते.
सुंठीचा लेप तयार करायला अगदी सोपा आहे. त्यासाठी सुंठ उगाळायची. उगाळण्यासाठी पाणी वापरायचे. सुंठ पूड असेल तर थोड्या पाण्यात कालवायची आणि लावायची. हा लेप खास डोक्यालाच लावला जातो. झोपही छान लागते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…