आरोग्य

जेवण झाल्यानंतर हे नक्की करुन पहा…

1) जेवणानंतर एक चमचा भाजलेले तीळ आणि जवस खावे. पचनासाठी आणि कोलेस्टेरॉल साठी उपयुक्त असतात.

२) दोन चमचे धणे व दोन चमचे जिरे एक लिटर पाण्यात रात्री भिजत घालणे. त्यात एक खडीसाखरेचा खडा टाकणे. सकाळी गाळून दिवसभर थोडे थोडे घेतल्यास लघवीची जळजळ कमी होण्यास मदत होते.

३) दोन वेलदोडे सोलून दोन्ही जेवणानंतर खावे. पित्ताच्या जळजळसाठी उपयोग होतो.

४) एक चमचा जिरे एक भांडे पाण्यात रात्री भिजत घालून सकाळी ते पाणी गाळून प्यावे. पचन व detoxification साठी मदत होते.

५. दोन्ही जेवणानंतर १०-१० मनुका खाल्ल्यास संडासला साफ होणे, मूळव्याध, फिशर, गॅसेस या सर्वांचा त्रास कमी होतो.

६) दोन्ही जेवणानंतर दोन चमचे जवस खावे. कफासाठी उपयोग होतो व पचनही सुधारते.

७) निरंजन फळ रात्री पाण्यात भिजवून सकाळी मिक्सर मधून काढून घेतल्यास मूळव्याधीसाठी उपयोग होतो.

८) ज्यांना पित्ताचा त्रास होतो तरीही जागरणे करावी लागतात त्यांनी रात्री झोपताना मनुका खाव्यात.

९) सकाळी उठल्यावर साळीच्या लाह्या किंवा खजूर खाल्ल्यानेज्यांना पित्तामुळे जळजळ किंवा मळमळ होते ती कमी होते.

१०) पंजाबी, मसालेदार अन्न खाल्ल्यावर बऱ्याच जणांना पोटाचा त्रास होतो. त्यामुळे असे जेवण झाल्यावर पाण्यात थोडे लिंबू पिळून पिऊन टाकावे. त्रास कमी व्हायला मदत होते.

११) ज्यांना वात किंवा पित्ताचा त्रास होत असेल त्यांनी दोन्ही जेवणापूर्वी दोन चमचे तूप खावे.

१२) पोटाला तडस लागेपर्यंत कधीही जेऊ नये. १/४ जागा वाताच्या चलनवलनासाठी रिकामी ठेवावी.

१३) पाणी पिताना घटाघटा पाणी न पिता तोंडाला भांडे लाऊनच प्यावे.

१४) दुपारचे जेवण १२ ते १२.३० पर्यंत आणि रात्रीचे ८ वाजेपर्यंत करावे.

१५) पोट साफ होत नसल्यास रोज रात्री भिजवलेले २०-२५ मनुके खावे.

१६) सकाळी उठल्यावर तुळशीची ५-६ पाने खावीत. घशातील कफ कमी होण्यास मदत होते.

१७) रात्री झोप नीट लागत नसल्यास पादाभ्यंग (गुडघ्याखाली पायाला मसाज) करावे. डोळ्यांसाठी पण याचा उपयोग होतो.

१८) पित्ताचा त्रास होत असेल तर तूर ऐवजी मूग डाळ वापरावी.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

6 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

10 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

10 तास ago