आरोग्य

उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी ‘या’ ५ फळांचे सेवन चुकूनही करू नये

भारतातील अनेक जण हे मधुमेहग्रस्त आहेत. मधुमेह हा जीवनशैलीमुळे झपाट्याने वाढणारा आजार आहे. दुर्दैवाने यावर कोणताही इलाज नाही. एकदा का मधुमेहाची लागण झाली, तर तुम्हाला त्याच्यासोबतच जगावं लागतं. मधुमेह असलेल्या लोकांना विशेषत: उच्च किंवा कमी रक्तातील साखरेचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, अयोग्य वेळा आणि शारीरिक कष्टाचा अभाव यांमुळे मधुमेहासारखे आजार मागे लागतात. मात्र, डायबिटिजवर नियंत्रण ठेवल्यास चांगले जीवन जगता येते. मधुमेहाच्या रुग्णांना आजारात आहारावर लक्ष ठेवावे लागत असते.

मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही खाऊ नयेत ‘ही’ फळे

1) द्राक्षे: मधुमेहाच्या रुग्णांसाठी द्राक्षे अत्यंत हानिकारक मानली जातात. द्राक्षे खाल्ल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते. त्यामध्ये फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे द्राक्षांपासून मधुमेहाच्या रुग्णांनी लांब राहिलेलेच चांगले ठरेल.

२) चेरी: चेरी हे फळ अनेकांना आवडते. पण, एक कप चेरीमध्ये साधारण २० ग्रॅम साखर असते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी चेरी खाणे टाळावे.

३) अननस: क जीवनसत्त्व असलेले अननस फळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे रक्तात लवकर विरघळते आणि ग्लुकोज वाढवते. अननसामध्ये सहा ग्रॅम साखर असते. ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असेल तितक्या प्रमाणात रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे मधुमेहींना अननस मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.

४) आंबे: फळांचा राजा सर्वांचा आवडता आहे; पण आंब्यामध्ये साखरेचे प्रमाणही जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. जर मधुमेही रुग्णांनी मोठ्या प्रमाणात आंबे खाल्ले, तर त्यांना हृदयरोग किंवा स्ट्रोकचा धोका होऊ शकतो. मधुमेहाच्या रुग्णांना साधारणपणे आंबा न खाण्याचा किंवा मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.

५) केळी: केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे; परंतु केळी खाल्ल्याने साखर आणि कर्बोदकांचे प्रमाण वाढू शकते. मधुमेह असलेल्या लोकांनी केळे हे फळ मर्यादित प्रमाणातच खावे. जास्त केळी खाल्ल्याने साखरेची पातळी वाढू शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

20 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

20 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

20 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago