आरोग्य

तरुणपणीच बसता- उठता गुडघे दुखतात? ‘या’ पद्धतीने चाला- म्हातारपणीही गुडघे दुखणार नाहीत

हल्ली वयाचा आणि गुडघेदुखीचा काहीही संबंध राहिलेला नाही. कारण पुर्वी साधारण वयाची पन्नाशी, साठी ओलांडली की मग गुडघे कुरकुरायला सुरुवात व्हायची. पण आता मात्र लाईफस्टाईलमध्ये झालेल्या बदलांमुळे कमी वयातच तरुण मंडळींचे गुडघे दुखायला सुरुवात झाली आहे. जमिनीवर मांडी घालून बसण्याचा, उठण्याचा बहुतांश लोकांना प्रचंड कंटाळा येतो कारण बसता, उठता गुडघे दुखतात हा त्रास टाळण्यासाठी आहारावरही थोडा भर दिला पाहिजे आणि व्यायामाकडेही जरा लक्ष दिलं पाहिजे.

गुडघेदुखी कमी करण्यासाठी व्यायाम

गुडघेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी कोणता व्यायाम करावा,याविषयीची माहिती आलिया भट, करिना कपूर यांच्यासारख्या सेलिब्रिटींच्या फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी साेशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये त्या सांगतात की गुडघेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी दिवसातून १० ते १५ मिनिटे दररोज नियमितपणे थोडे उलटे चालावे. म्हणजेच पुढे जाण्याच्या ऐवजी मागे जावे. अशा पद्धतीने चालल्यामुळे गुडघ्यांवर योग्य तो दाब येऊन त्यांचा व्यायाम होतो. याशिवाय गुडघ्यांशी जोडलेले असणारे पोटऱ्यांचे स्नायू तसेच मांडीचे स्नायू यांचाही व्यायाम होतो आणि गुडघेदुखीचा त्रास खूप कमी होतो.

उलटे चालल्यामुळे होणारे इतर फायदे

उलट्या पद्धतीने चालल्यामुळे गुडघेदुखीचा त्रास तर कमी होतोच, पण त्यासोबतच इतरही काही फायदे होतात.

१) पहिला फायदा म्हणजे पायाच्या घोट्यांचाही योग्य व्यायाम होतो आणि ज्यांचे घोटे दुखतात, तो त्रासही कमी होण्यास मदत होते.

२) मेंदूचे कार्य अधिक चांगले होण्यास मदत होते. आपला मेंदू आणखी ॲक्टीव्ह होतो..

3) दोन्ही पाय तसेच मेंदूमधला समन्वय वाढण्यास आणि त्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते.

४) शरीराचा योग्य तो समतोल साधण्याची आपली क्षमता वाढू लागते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

8 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

8 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

12 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

12 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

12 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

12 तास ago