आरोग्य

हळदीमुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो का, हळद किती सेफ आणि किती घातक…

भारतीय पदार्थांमध्ये हळदीला फार महत्व आहे. हळदीशिवाय अनेक पदार्थ बनूच शकत नाहीत. हळदीनं पदार्थांना रंग-टेस्ट तर मिळतेच, सोबतच यात अनेक औषधी गुणही असतात. ज्याकारणानं आयुर्वेदातही हळदीला खूप महत्व आहे. वेगवेगळ्या उपचारांमध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदीमधील करक्यूमिन, अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी तत्व आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मात्र, काही लोकांचं मत आहे की, हळद आपल्या किडनींसाठी चांगली नसते.

हळद किडनीसाठी नुकसानकारक…

जेव्हा हळदीचं सेवन संयमानं केलं जातं तेव्हा ती किडनीसाठी टॉक्सिक ठरत नाही. समस्या याचा जास्त वापर केल्यानं होते. कारण फार जास्त करक्यूमिन घेतल्यानं लघवीमध्ये ऑक्सालेटचं प्रमाण खूप वाढतं. ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक वाढतो.

जास्त हळद खाण्याचे नुकसान

हळदीमध्ये ऑक्सालेटचं प्रमाण भरपूर असतं, ज्याचा अर्थ जर तुम्ही हळद वेगवेगळ्या माध्यमातून जास्त खात असाल तर किडनी स्टोन तयार होण्यास मदत मिळते. खासकरून अशा लोकांना जास्त धोका असतो ज्यांना आधीच किडनी स्टोनची समस्या आहे किंवा होऊन गेली आहे.

जेवणातील हळदीचं कमी प्रमाण नुकसानकारक नाही. मात्र, जर याचा जास्त वापर केला गेला तर किडनीवर जास्त दबाव पडू शकतो. त्याशिवाय काही रिपोर्ट्स सांगतात की, हळदीचं जास्त प्रमाण आधीच आजारी असलेल्या लोकांमध्ये किडनी फेलिअरचं कारणही ठरू शकतं.

कारण किडनींना शरीरातील अतिरिक्त रसायनं फिल्टर करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. ज्यामुळे टॉक्सिन वाढू शकतात. हळद किडनीचा आजार, डायबिटीस किंवा ब्लड क्लॉटिंगच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांसोबत रिअॅक्ट होऊ शकते. करक्यूमिनचा जास्त डोस नेफ्रोटॉक्सिक इफेक्ट टाकू शकतो आणि रीनल डॅमेज वाढू शकतं. ज्यांना किडनी डिजीज आहे त्यांना याचा धोका अधिक असतो.

हळदीचा सुरक्षित वापर कसा करावा…

भाजी, सूप, चहा, काही पदार्थांमध्ये हळदीचा कमी प्रमाणात वापर सुरक्षित असतो. कॅल्शिअम रिच फूड्स जसे की, डेअरी प्रोडक्ट्स, पालेभाज्या, बदाम यात हळद मिक्स केली तर ऑक्सालेट कमी करण्यास मदत मिळते आणि त्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोकाही कमी होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद

मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…

3 तास ago

मांडवगण फराट्यात डॉ अतुल सुराणा ठरले ‘देवदूत’; बेशुद्ध रुग्णाला CPR देऊन वाचवला जीव

न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक…

4 तास ago

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

17 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

1 दिवस ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

1 दिवस ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

1 दिवस ago