आरोग्य

गुळ आणि जिऱ्याचं पाणी प्यायल्यास काय होतं? फायदे वाचाल तर रोज प्याल

फार पूर्वीपासून गुळाला आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. गुळामधील औषधी गुणांमुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी गुळाचा वापर केला जातो. अशात गूळ आणि जिरं एक करून वापरलं तर आरोग्याला वरदान ठरेल असं औषध तयार होतं. गूळ आणि जिऱ्याचं पाणी आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतं. अशात ड्रिंकचे फायदे आणि ते कसं तयार करावं हे जाणून घेऊ.

कसं बनवाल गूळ आणि जिऱ्याचं पाणी

गूळ आणि जिऱ्याचं पाणी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी टाका. आता यात एक चमचा जिरे आणि गुळाचा एक छोटा तुकडा टाका. या पाण्याला चांगली उकडी येऊ द्या. पाणी चांगलं उकडल्यानंतर आणि रंग बदलल्यानंतर एका ग्लासमध्ये गाळून घ्या. हे पाणी पिऊन आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करता येतात.

आरोग्यासाठी वरदान

गूळ आणि जिऱ्याच्या पाण्यानं बॉडी डिटॉक्स करण्यास मदत मिळते. हे पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि अनेक समस्यांचा धोकाही कमी होतो. त्याशिवाय जर हे पाणी नियमितपणे प्याल तर शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. या नॅचरल ड्रिंकनं जॉइंट्समधील दुखणंही कमी होतं.

दूर होतील अनेक समस्या

जर तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडत असाल तर गूळ आणि जिऱ्याचं पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. कारण हे पाणी पिऊन इम्यूनिटी वाढते आणि इम्यूनिटी वाढली तर वेगवेगळे इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव होतो. महिलांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनाही या ड्रिंकनं दूर होतात. पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होऊन पचन तंत्र मजबूत होतं. तसेच हे ड्रिंक बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासही फायदेशीर ठरतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

13 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

14 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

15 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

15 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

15 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

15 तास ago