आरोग्य

रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची नक्की खा; आरोग्यदायी फायदे समजल्यावर व्हाल चकीत

वेलची हा स्वयंपाकघरात महत्त्वाची मानली जाते. याचा उपयोग फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो असं नाही तर आरोग्याविषयक अनेक समस्यांवरही ती गुणकारी ठरते. विशेषतः जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची खाल्ल्यात तर त्याचे तुमच्या शरीराला चकीत करणारे फायदे होऊ शकतात. जी अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. फक्त २ वेलची खाल्ल्याने तुमची पचनशक्ती तर सुधारतेच पण त्याचबरोबर ॲसिडिटी, झोपेची समस्या आणि तोंडातून येणारा वास यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. एवढेच नाही तर वेलचीचे हे छोटे दाणे तुमच्या शरीराला डिटॉक्स करून सकाळी ताजेतवाने वाटण्यास मदत करू शकतात.

१) पचनक्रिया सुधारते

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्यास पचनक्रिया मजबूत होते. वेलचीमध्ये आढळणारे नैसर्गिक घटक पोटातील गॅस, ॲसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत करतात. हे तुमचं अन्न नीट पचण्यास मदत करतं आणि पोट साफ होतं.

२) झोपेची गुणवत्ता सुधारते

जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल किंवा वारंवार झोप येण्यात त्रास होत असेल तर वेलची तुम्हाला मदत करू शकते. वेलचीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि मन शांत राहतं. झोपण्यापूर्वी खाल्ल्याने चांगली झोप येते.

3) तोंडातून वास येत नाही

वेलची खाल्ल्याने तोंडातून वास येत नाही. दात आणि हिरड्याही निरोगी राहतात.

4) वजन कमी करण्यात मदत

वेलची मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते. रात्री खाल्ल्याने शरीरातील फॅट वेगाने बर्न होते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. सूज कमी होते.

५) इम्यून सिस्टिम मजबूत

वेलचीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे शरीराला संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात. हे इम्यून सिस्टिम मजबूत करतात आणि सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्यांपासून आराम देतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

12 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

15 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

15 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

15 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

16 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

16 तास ago