आरोग्य

हे पाच सुपर फूड्स खाल्ल्याने भूक आणि लठ्ठपणा नियंत्रणात राहील

कधीकधी अचानक जास्त भूक लागने किंवा जास्त प्रमाणात खाणे ही सर्वसामान्य आणि सर्वांसोबत घडणारी गोष्ट आहे. परंतु जर तुम्ही नियमित योग्य पद्धतीने जेवण करत असाल आणि आणि तरीही तुमचे पोट भरत नसेल आणि तुम्हाला सतत काहीतरी खावंसं वाटत असेल, तर कदाचित तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते.

कारण असं होणं म्हणजे तुमचे वजन जलद गतीने वाढण्याचे ते संकेत आहेत. त्यामुळे सतत भूक लागण्यावर ती नियंत्रित करणं खूप गरजेचं आहे. अन्यथा, तुम्हाला सतत लागणारी भूक ही वजन वाढण्यासह इतर आजारणाही निमंत्रण देण्याची शक्यता आहे.

शिवाय आजकाल लठ्ठपणा ही एक अतिशय गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे लोक आपलं वजन कसे वाढणार नाही याची खूप काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतात. शिवाय वाढत्या वजनामुळे केवळ शरीरच खराब दिसत नाही तर अनेक गंभीर समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे अनेकांना आपलं वजन कमी करण्याची इच्छा असते पण त्यांना भूक कंट्रोल करता येत नाही. चला तर मग जाणून घेऊया अशा ५ सुपरफूडबद्दल माहिती, जे खाल्ल्यानंतर जास्त भूक लागत नाही आणि लठ्ठपणाची समस्याही उद्भवत नाही…

वजन कमी करण्यासाठीचे ते ५ सुपरफूड्स

बदाम: बदाम हे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले सुपरफूड आहे. त्यात व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, हेल्दी फॅट, प्रथिने आणि फायबर असतात. बदाम खाल्ल्याने भूक लागणं खूप कमी होते. तसंच त्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ई मुळे वजन वाढण्यास आळा बसतो.

नारळ: नारळ हे आपणाला सहज आणि कुठेही उपलब्ध होणारे फळ आहे. नारळात लॉरिक ऍसिड, कॅप्रोइक ऍसिड, कॅप्रिलिक ऍसिड असे अनेक घटक आढळतात. ज्यामुळे आपणाला पोट भरल्यासारखे वाटते. नारळाला जलद गतीने फॅट बर्न करणारे फळ मानले जाते.

ताक: ताक हे प्रोबायोटिक पेय आहे. शरीराची तरलता राखण्यासाठी ताकापेक्षा चांगला पर्याय नाही. ताक प्यायल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे आपोआप लठ्ठपणाला आळा बसतो.

मोड आलेले हरभरे: मोड आलेल्या हरभरामध्ये जास्त प्रथिने आढळतात. त्यामध्ये भूक कमी करणारे हार्मोन्स असतात. याशिवाय त्यात फॅट आणि कार्बोहायड्रेट्स खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे मोड आलेला हरभरा हा लठ्ठपणाचा शत्रू असल्याचे मानले जाते.

भाज्यांचा रस: भाज्यांच्या रस हा लठ्ठपणा मुळापासून दूर करतो. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर जास्त वेळेपर्यंत भूक जाणवू देत नाहीत. भाजीपाल्याच्या रसात जवसाच्या बिया मिक्स केल्या तर ते शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जाते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

8 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

17 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago