आरोग्य

थकवा, मूड स्विंग्स, नाइट शिफ्टचा शरीरावर वाईट परिणाम

आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सर्वच जण खूप मेहनत करत असतात. बहुतेक ऑफिसची वेळ १० ते ६ पर्यंत असते, परंतु अनेक ऑफिसमध्ये वेगवेगळ्या शिफ्ट असतात. अशा परिस्थितीत कधी मॉर्निग शिफ्टमध्ये तर कधी नाइट शिफ्टमध्ये काम करावं लागतं. पण बरेच लोक कायमस्वरूपी नाइट शिफ्टमध्ये काम करतात, ज्यामुळे त्यांचा संपूर्ण दिनक्रम बदलतो.

नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. ते तंदुरुस्त, उत्साही आणि सक्रिय वाटत नाहीत. आरोग्यासंबंधी अनेक तक्रारी असतात. त्यांना थकवा, अशक्तपणा जाणवतो, पचनाचा त्रास होतो. त्यामुळे नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यामुळे ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त राहतील.

नाइट शिफ्टमुळे डिप्रेशनचा धोका वाढतो, मूड स्विंग्स होतात, डायबेटिस होण्याची शक्यता आणि झोपेची कमतरता असल्याने अनेक गंभीर गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाइट शिफ्ट असलेला जॉब सोडा. हे खरंच गरजेचं आहे पण काही लोकांसाठी हे प्रॅक्टिकली शक्य नाही. त्यामुळे नाइट शिफ्ट करताना काही गोष्टींची नक्कीच काळजी घ्या.

रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत काहीही खाऊ नका

रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत काहीही खाऊ नका. नाईट शिफ्ट करणाऱ्या खूप लोकांच्या त्यांच्या मॅनेजरपेक्षा स्विगी बॉयसोबत जास्त मिटींग असतात.

भरपूर पाणी प्या

या वेळेत तुम्हाला जर खूप भूक लागली तर कृपया जास्तीत जास्त पाणी प्या. मध्यरात्री स्नॅक्स किंवा काहीही खाणं टाळा.

प्रोटीन आणि फायबरयुक्त आहार

तुम्ही जे रात्रीचं जेवण जेवणार आहात ते पोषकत्त्वांनी परिपूर्ण असावं, प्रोटीन आणि फायबरयुक्त असावं. त्यामध्ये अंडी, पनीर, फळं अशा गोष्टींचा नक्की समावेश करा.

खूप लोक रात्री दोन वाजता आपल्या सहकाऱ्यांसोबत चहा प्यायला जातात. त्यावेळी ते चहावाला नेमके किती पैसे कमावत असेल याविषयी चर्चा करतात. पण नाईट शिफ्ट केल्यावर रुग्णालयात जेव्हा आपल्याला उपचारासाठी दाखल करावं लागेल तेव्हा किती पैसे खर्च करावे लागतील यावर ते कधीच बोलत नाहीत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

5 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago