आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस ठिक नाही. तुम्ही ठरवेलली किंवा आखलेली कामे अपेक्षेप्रमाणे पूर्ण होतीलच असे नाही. त्यामुळे कोणालाही वचन देताना संयम ठेवा. मदतीचा भाव मनात असला तरी समोरची व्यक्ती तुमचा गैरफायदा घेत नाही ना, याची खात्री करणे गरजेचे आहे. चांगले करण्याच्या नादात स्वतःचे नुकसान होऊ नये यासाठी प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यायला हव.

वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस ठिक पण तुमच्यावर अतिरिक्त जबाबदारी येण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर समाधानी असून कौतुक आणि बोनसचे संकेत आहेत. वेळेचे योग्य नियोजन केल्यास प्रोजेक्ट पूर्ण होणे सोपे जाईल. घरगुती जबाबदाऱ्याही वाढतील. एखाद्या जाणकाराचा सल्ला घेतल्यास अडचणी कमी होणार.

मिथुन: मिथुन राशीसाठी दिवस ठीक आहे. ऑफिसमध्ये जबाबदारीचे काम तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते. कामात पूर्ण लक्ष दिल्यासच यश मिळेल. प्रवासात एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट होईल आणि त्वरित मदत करावी लागेल. अडचणी येतील, मात्र आत्मविश्वास टिकवून ठेवल्यास परिस्थिती हाताळणे सोपे जाईल.

कर्क: कर्क राशीसाठी दिवस ठिक पण भावनेच्या भरात घेतलेले निर्णय पुढे अडचणी निर्माण करू शकतात. त्यामुळे प्रत्येक निर्णय प्रॅक्टिकल दृष्टीने घ्या. सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित ठेवा. व्यवसायात काम वाढत असून प्रत्येक बाब नीट तपासणे आवश्यक आहे. क्रिएटीव्ह कामाची संधी मिळण्याचा योग आहे.

सिंह: सिंह राशीसाठी दिवस ठीक असला तरी आजूबाजूच्या वातावरणाकडे विशेष लक्ष द्या. विरोधक आणि स्पर्धक सक्रिय आहेत. हुशारी आणि सतर्कतेने काम केल्यास अडथळे टाळता येतील. कामाचा वेग वाढवा आणि वेळेचे नियोजन ठेवल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने राहील.

कन्या: कन्या राशीसाठी दिवस ठिक असून नोकरी किंवा व्यवसायात काही बदल करावे लागतील. विश्वासू लोकांची मदत घेऊन काम वेळेत अपडेट करा. मेहनत वाढेल, मात्र धनलाभाचे योग आहेत. भावनिक बाबतीत निर्णय घेताना संपूर्ण माहिती आणि परिस्थिती लक्षात घ्या. गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे सावध राहणे आवश्यक आहे.

तूळ: तूळ राशीसाठी कठोर मेहनत आहे. कामाच्या ठिकाणी मेहनत वाढेल, पण सहकाऱ्यांची मदत लाभेल. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करताना काळजी घ्या. नियोजनबद्ध काम केल्यास ताण कमी होईल. नातेसंबंधात स्पष्ट संवाद ठेवा, पण कोणतेही शब्द किंवा कृती नात्याला धक्का देणार नाही याकडे खास लक्ष द्या.

वृश्चिक: वृश्चिक राशीसाठी दिवस ठीक आहे. नोकरी शोधणारे किंवा नवीन व्यवसायाचा विचार करणाऱ्यांना मदतीचा हात मिळेल. तुमच्या क्षमतेनुसार काम करत राहा. व्यवसायात सहकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचा विचार पुढे येईल. त्याबद्दल नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. सकारात्मक बातमी मिळण्याचा योग आहे.

धनु: धनू राशीसाठी दिवस धावपळीचा असून काम करताना घाईगडबड टाळा. निष्काळजीपणामुळे महत्त्वाची संधी तुम्ही घालवू शकता म्हणून सावध राहा. जबाबदारी वेळेत न घेतल्यास दुसरे कोणी ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरू शकते. नियोजन आणि शिस्त ठेवल्यास यशाचा मार्ग खुला होईल.

मकर: मकर राशीसाठी दिवस चांगला आहे. जुने प्रलंबित संकल्प पूर्ण करण्याची संधी मिळेल. काम लांबवले तर पुढे अडचणी आणि खर्च वाढू शकतो. एखादा नवस केला असेल तर तो पूर्ण करण्याचा विचार करा. मेहनत जास्त असेल, थकवा जाणवेल, पण प्रयत्न यशस्वी ठरतील

कुंभ: कुंभ राशीसाठी दिवस चांगला आहे. दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल जाणवतील. मोठे पद किंवा संधी मिळत असेल तर स्वीकारण्यात विलंब करू नका. प्रमोशन सोबत जबाबदारी वाढेल, पण तुम्ही ती समर्थपणे सांभाळाल. व्यवसायात नवीन ग्राहक मिळत असल्याने गुणवत्तेवर विशेष लक्ष द्या..

मीन: मीन राशीसाठी दिवस फारसा ठिक नाही. अनावश्यक दिखावूपणापासून दूर राहा. अती शहाणपण दाखवल्यास कामात अडथळे येऊ शकतात आणि लोक दुरावू शकतात. प्रवासात आरोग्याची काळजी घ्या. संध्याकाळी एखाद्या समारंभासाठी सज्ज व्हावे लागेल, त्यामुळे दिवस संयमाने आणि शांततेत घालवा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

7 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

7 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

7 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

7 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

7 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

11 तास ago