आरोग्य

ओले खोबरे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

ओल्या खोबऱ्यात व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शियम, मिनरल्स भरपूर प्रमाणात असते. गृहिणी स्वयंपाकात खोबऱ्याचा वापर करतात. नारळाचे उत्पादन मुख्यतः कोकणामध्ये होते नारळाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. नारळाचं पाणी शरीरासाठी अतिशय पोषक असते. ओल्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात जे आपल्या चेहऱ्यासाठी खूप आवश्यक असतात. ज्यांची त्वचा निस्तेज आणि कोरडी आहे त्यांनी नारळाच्या दुधाने चेहऱ्याला मसाज केल्यास चेहरा एकदम टवटवीत दिसतो.

वजन कमी करण्यासाठी नारळ अतिशय उपयुक्त ठरतो. नारळाचे दूध हे भुकेवर नियंत्रण ठेवते त्यामुळे वजन नियंत्रित राहते. खोबरे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. ओले खोबरे सोबत गुळ देखील खाऊ शकतो अथवा बदामाची पूड खाल्ल्यानेही बराच फायदा होतो. खोबरे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. ओल्या खोबऱ्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. जर तुमचे पोट साफ होत नसेल तर तुम्ही नित्य खोबरे खा त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होईल. केस गळत असतील तर त्याचे पाणी केसांना लावू शकता त्यामुळे तुमचे केस गळणे बंद होईल. केसांसाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे या पाण्यामुळे तुमचे केस मुलायम देखील होतील.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

2 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

7 तास ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

11 तास ago

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

1 दिवस ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

1 दिवस ago