आरोग्य

लवकर झोप येण्यासाठी घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय

लवकर झोप येण्यासाठी काय करावे…
आजकाल तरुण तसेच वयस्क वर्गात रात्री लवकर झोप न येण्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. हे लोक रात्रभर इकडून तिकडे पालटत राहतात. पण त्यांना झोप येण्याचे नाव घेत नाही. परंतु काही लोक असेही असतात ज्यांना अंथरुणावर पडता बरोबर झोप लागते तर या उलट काही लोक असे आहेत ज्यांना अंथरुणात शिरण्याचा अनेक तासांनंतरही झोप येत नाही. आजकाल च्या धावपळीच्या जीवनात झोप न येणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. निद्रानाश ची ही समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. हे लवकर झोप येण्यासाठीचे उपाय तज्ञ मंडळी द्वारे सांगण्यात आले असून मागील काही काळात यांच्या नियमित उपयोगाने अनेकांनी आपली झोप न येण्याची समस्या सोडवली आहे. तर चला सुरू करुया…

झोप येण्यासाठी घरगुती उपाय
१) झोपण्याआधी पायांना स्वच्छ धुवावे, शक्य होईल तर कोमट पाण्याने पाय स्वच्छ करावेत. यानंतर पायाच्या तळव्यांना खोबरेल तेलाने मालिश करावी. झोपताना जास्त टाईट कपडे परिधान करु नये. शक्य होईल तेवढे कमी कपडे अंगावर ठेवावेत.
२) झोपण्याचा एक तास आधी मोबाईल, टीव्ही व इतर कोणतीही स्क्रीन पाहू नये. शांत झोप हवी असेल तर झोपण्याआधी मोबाईलला अजिबात हात लावू नये.
झोपताना आपले पाय उत्तरेकडे करुन झोपावे. दक्षिण दिशेला पाय करुन कधीही झोपू नये. याशिवाय देवी-देवतांच्या मूर्ती, फोटो व प्रतीमेकडे देखील पाय करु नयेत.
३) आयुर्वेदानुसार दुपारी झोपल्याने शरीरात कफ वाढतात. जर रात्री शांत झोप हवी असेल तर दुपारी झोपणे टाळावे.
४) 40 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या 305 लोकांवर केल्या गेलेल्या एका संशोधनानुसार, “सकाळ तसेच संध्याकाळी योग आणि व्यायाम करणाऱ्या लोकांना रात्री झोप येण्यास अडचण होत नाही.” म्हणून दररोज नियमित व्यायाम करायला हवा. आणि 2-3 किलोमीटर पायी चालायला हवे.
५)पुस्तक वाचन हा एक चांगला छंद असण्यासोबतच तो आपल्या मेंदूला शांती प्रदान करतो. म्हणून जर रात्री झोप येत नसेल तर तुम्ही कोणतेही एक पुस्तक वाचू शकतात. परंतु मोबाईल मध्ये ebook वाचणे टाळावे.
६) झोपताना डोक्याखाली उशी घेणे प्रत्येकालाच आवडते. उशी घेतल्याने मानेला आराम देखील मिळतो. परंतु जर तुम्हाला शांत झोप येत नसेल तर तुम्ही उशी शिवाय झोपण्याचा प्रयत्न देखील करुन पाहू शकता.

झोप येण्यासाठी 30 सेकंद वाला फॉर्म्युला…
झोप येण्यासाठी हा उपयुक्त फॉर्म्युला आहे. याच्या नियमित अभ्यासाने लोक 30 सेकंदातच झोपू शकतात. यासाठी सर्वात आधी शरीराला पूर्णपणे रिलॅक्स करा. आता हुश्श आवाज करत हळुवार तोंडाने श्वास आत भरा. 7 सेकादांपर्यंत श्वास आत ठेवा. नंतर तोंड बंद करुन नाकाने हळुवार श्वास बाहेर सोडा. आता नाकाने श्वास आत घ्या. 7 सेकंद थांबून तोंडाने सोडा. या पद्धतीला 3 वेळा करा. तर वाट कसली पाहताय आज रात्रीच झोप येण्यासाठी घरगुती उपाय.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

16 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

16 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

19 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

20 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

20 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

20 तास ago