आरोग्य

सततची झोप, जांभळ्या येणे, अशक्त पणा वाटणे अश्या समस्यांना घरगुती उपाय

झोप पूर्ण न होणे:- आपल्या शरीराला किमान 7 ते 8 तास शांत झोपेची आवश्यकता असते. रात्री झोपताना मोबाईल, टॅबचा वापर केल्यानं लवकर झोप लागत नाही. काही वेळा झोपेत मध्येच आपण दचकून उठतो. भीतीनं किंवा टेन्शनमुळेही झोप पूर्ण होत नाही. मेंदू थकल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो.

प्रमाणापेक्षा जास्त खाणे:- आपण आपला आहार हा थोडी भूक राखून घेतला पाहिजे म्हणजे आपण खाल्लेले अन्न व्यवस्तीत पचेल सुरवातीला जेवण कमी झालं असं वाटलं पण नंतर आपणास सवय लागून जाते.

पुरेसा व्यायाम न करणे:- आपल्या शरीराला उत्साही आणि आनंदी ठेवण्यासाठी किमान रोज सकाळी 30 मिनिटं वेगवेगळे व्यायाम करणं आवश्यक आहे. व्यायाम केल्यानं रक्ताभिसरण चांगलं होतं. शरीरातील पेशी अधिक चांगल काम करतात तुम्ही दिवसभर उत्साही आणि आनंदी राहता.

आहारात प्रथिनांचं प्रमाण कमी:- तुमच्या आहारात भरपूर फळ, अंड, दूधाचा वापर करायला हवा. प्रथिनांचा वापर करायला हवा. चीज, मासे, दही, योगर्ट शेंगदाण्याचा वापर आहारात करा. फास्ट फूड पचनासाठी जड असतं. ते खाणं टाळा. वेळेवर आहार घ्या.

साखरयुक्त पदार्थांचं सेवन टाळा:- साखरेचं प्रमाण अति असणारे गोड पदार्थ तुम्हा वारंवार खात राहिलात तर तुम्हाला आळस येऊ शकतो. त्यामुळे दिवसभर मरगळलेले किंवा थकलेलं वाटू शकतं. साखरेचं प्रमाण कमी असणारे पदार्थ खाण्यावर भर द्या.

शरीरात लोहाची कमतरता:- आपल्या शरीरातील हिमोग्लोब्लीन किंवा रक्त कमी झालं तरीही आपण काहीही काम न करता आपल्याला दमल्यासारखं होतं. खूपदा डोकं दुखतं आणि चक्करही येते. त्यामुळे तुमच्या आहारात पालेभाज्या, हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी आवश्यक असणारी फळ, खाद्यपदार्थ खाणं आवश्यक आहे.

ताणतणाव:- कामाच्या ठिकाणी किंवा घरातही काही वेळ तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. गाणी ऐकणं, चित्र कारणं, फिरणे काहीही जे तुम्हाला आवडतं ते. ज्यामुळे तुम्हाला आलेला ताण कमी होईल. किंवा कामाच्या टेन्शनपासून काही वेळ स्वत:ला लांब ठेवा त्यामुळे तुमचा मूड फेश होईल आणि अधिक जोमानं काम करू शकाल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

33 मिनिटे ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

21 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

21 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

21 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

21 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

21 तास ago