क्राईम

शिरूर शहरात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरात शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्याचे शिरूर पोलिसांनी सांगितले आहे.

मुलीच्या कुटुंबीयांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रणव अशोक उबाळे (रा. रामलिंग रोड, शिरुर ता. शिरुर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, शिरूर शहरात शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी तिच्या मामाच्या गावी राहत असून, ती महाविद्यालयात जात असताना प्रणव उबाळे हा वारंवार भेटून तिच्याशी बोलण्याबाबत दबाव टाकत होता. मुलगी भेटण्यास व बोलण्यास नकार देत होती. यामुळे प्रणव याने तू शिक्षण घेत असलेल्या शाळेत तसेच शाळेबाहेर तुझी बदनामी करेल अशी धमकी देखील दिली. हा त्रास असह्य झाल्याने तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे करत आहेत.

शाळकरी व कॉलेज शिकणाऱ्या मुली, महिला शिरूर शहरात पुर्णपणे सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शिरूर शहर परिसरातील कॉलेज व इतर शालेय परिसरात रोड रोमियांचा चांगलाच धुमाकुळ चालू असून शिरूर पोलिसांनी आता कडक कारवाई करणे गरजेचे आहे. रोडरोमिंओवर दंडात्मक कारवाई होत असल्याने दंड भरून हे रोड रोमिओ पुन्हा मोकाट सुटत असून त्यांना प्रसाद देवून धिंड काढणे गरजेचे आहे. याबाबत आता शिरुर पोलिसांनी आता अॅक्शन मोडमध्ये येवून कडक कारवाई करावी, अशी मागणी परीसरातील महिला व नागरीकांकडून होत आहे.

शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची हत्या महिलेसोबत झालेल्या चॅटींगच्या रागातून…

शिरूर तालुक्यात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या…

शिरूर तालुक्यात पत्नीच्या विरहाने पतीची गळफास घेऊन आत्महत्या…

शिरूर तालुक्यात महाविद्यालयीन प्रेमीयुगलाची गळफास घेऊन आत्महत्या…

शिरूर तालुक्यात ऑनलाइन गेममधील नैराष्यातून आत्महत्या…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

2 दिवस ago