आरोग्य

मुळव्याधीवर घरगुती उपाय

मूळव्याध चा त्रास आजकाल खूप जास्त प्रमाणात वाढत आहे, संडासवाटे रक्त पडणे, मुळव्याधचा त्रास होणे हे आपण घराच्या घरी १० मिनिटांत थांबू शकतो

लिंबू व सैंधव मीठ

1) लिंबू घ्या, त्याला मधून चिरा.

2) त्यावर सैंधव मीठ टाखा.

3) ते लिंबु चोखून चोखून .

4) आंबट लागल्यास मीठ परत -परत टाखा व लिंबू चोखून चोखून खा (लिंबु संपे पर्यंत).

5) हे एकदा जरी केलं तरी १० मिनिटात रक्त पडणे बंद होईल.

6) हा उपाय १० दिवस सकाळ-संद्याकाळ जेवल्यानंतर केला तर मूळव्याध पूर्ण बरा होतो.

मुळा: नावाप्रमाणे मूळव्याधीवर मुळा हा रामबाण उपाय मानला जातो. मुळा खाल्ल्याने मूळव्याध असलेल्या रुग्णाला आराम मिळतो. थंडावा मिळतो आणि पचनक्रिया सुधारते.

सर्वसाधारण उपचार

मूळव्याधीवर सुद्धा त्रिदोष, व्यक्तीची प्रकृती, रोगाची तीव्रता वगैरे अनेक गोष्टींचा विचार करून नेमक्या औषधांची योजना करावी लागते

यावर सर्वसाधारणतः केले जाणारे उपचार

रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात दोन-तीन चमचे गायीचे साजूक तूप टाकून घ्यावे.

मोडाच्या ठिकाणी वेदना असल्यास बेलफळाचा गर व पाठाचूर्ण मिसळून घ्यावे किंवा सुंठ व पाठाचूर्ण एकत्र करून घ्यावे.

सुरण ही भाजी मूळव्याधीत औषधच होय. सुरण वाफवून केलेली भाजी, फुलका, तूप व ताक असा आहार काही दिवस घेतल्यास उत्तम फायदा होतो.

रक्त पडत असल्यास घरचे ताजे लोणी व नागकेशर हे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घ्यावे.

मोडाच्या ठिकाणी आग होत असल्यास दूर्वांच्या रसात भिजवलेली कापसाची घडी मोडाच्या ठिकाणी ठेवावी.

मोड सुजला असून दुखत असल्यास गोवरीच्या विस्तवावर तूप टाकून त्याची धुरी घ्यावी किंवा खजुराच्या बीचे चूर्ण करून त्याची धुरी घ्यावी.

कफज मूळव्याध असून मोडाला खाज येत असल्यास जेवणापूर्वी तसेच जेवणानंतर सुंठ व ओव्याची पूड टाकून ताक प्यावे.

मोडाच्या ठिकाणी वेदना व आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा गर ठेवावा.

तीळ वाटून गरम करून शेकल्यास मोडाच्या ठिकाणची वेदना कमी व्हायला मदत होते.

व्याधीवर शस्त्रकर्म किंवा क्षारकर्म केले तरी मुळातल्या मंद अग्नीवर योग्य उपचार करून मूळव्याधीवर खरे उपचार करणे व पथ्य पाळणे आवश्यक असते; अन्यथा पुन्हा त्रास उद्भवू शकतो.

मूळव्याध असो किंवा फिशर, भगंदर असो, एक तर या सर्व रोगांचा त्रास फार भयानक असतो. शिवाय संकोचापायी यांचे वेळेवर योग्य निदान केले जात नाही, परिणामतः उपचारही मिळत नाहीत. त्रास फारच असह्य झाला तर पटकन गुण यावा म्हणून शस्त्रकर्माकडे झुकण्याचा कल वाढतो. क्वचित एखाद्या व्यक्तीमध्ये शस्त्रकर्म, क्षारसूत्र वगैरे उपचारांची आवश्यकता असली तरी केवळ बाह्योपचार रोगाला बरे करण्यास असमर्थ असतात याचेही भान ठेवायला हवे. मंद अग्नी, अपचनाची प्रवृत्ती आणि आतड्यांमधला कोरडेपणा, उष्णता हे सर्व बरे केल्याशिवाय या त्रासापासून कायमची सुटका होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे या प्रकारचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून पहिल्यापासूनच आहार-आचरणात काळजी घ्यायला हवी. तरीही त्रास झालाच तर वेळेवर योग्य उपचार घेऊन तो मुळापासून बरा करण्यावर भर द्यायला हवा.

पथ्याच्या गोष्टी: तांदूळ, गहू, यव, ज्वारी, दुधी, पडवळ, तोंडली, सुरण, परवर, आंबट चुका, घोसाळी, मूग, तूर, लोणी, तूप, ताक, आले, सुंठ, मनुका, आवळा.

अपथ्याच्या गोष्टी: नाचणी, मका, उडीद, वाल, पावटा, चवळी, शेंगदाणे, रताळे, तळलेले तिखट पदार्थ, शेंगदाणे, लोणची, पापड वगैरेंचा अतिरिक्त वापर.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; रस्त्यातील दुचाकी काढण्यास सांगितल्याने सात जणांनी शेतकऱ्याला मारहाण करत कारच्या काचा फोडल्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रस्त्याच्या मध्यभागी उभी केलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन काही गुंड…

9 तास ago

अजितदादांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणणारच! जय पवारांचा निर्धार; CID तपासाचा घेतला आढावा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची…

10 तास ago

महाराष्ट्राला ‘झाडखाऊ’ मुख्यमंत्री नको! टोरंट प्रकल्पावरून हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात

‘विकासाला विरोध नाही, विनाशाला विरोध’; कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीची उद्या सपकाळ करणार पाहणी मुंबई: कर्जत-भीमाशंकर परिसरात प्रस्तावित…

10 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल! उमेश पाटील राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते, झिशान सिद्दीकींकडे मुंबईची धुरा

सुनेत्रा पवारांकडून नियुक्त्यांची घोषणा; पार्थ पवारांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या संघटनात्मक…

10 तास ago

शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींना हात लावाल तर रस्त्यावर उतरू; विजय वडेट्टीवारांचा इशारा

गडचिरोली : प्रस्तावित विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे अधिग्रहण करण्यास विरोध करत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय…

10 तास ago

शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीच्या पाण्यावरून वाद पेटला; दगड अन् कुऱ्हाडीने मारहाण…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीवरील पाण्याची मोटार बंद केल्याचा जाब विचारणे आणि…

16 तास ago