आरोग्य

दिवसभरात आपण किती वेळा श्वास घेतो

२४ तासात मनुष्य किती वेळा श्वास घेतो? मानवी शरीर प्रत्यक्षात एखाद्या रहस्याहून कमी नाही. किंबहुना वैज्ञानिकही याविषयी अनेक संशोधनं करत असताना वेळोवेळी थक्क होतात. मानवी शरीर आणि त्यासंदर्भातील अनेक सिद्धांत आजवर मांडण्यात आले आहेत. कैक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरंही यातून सातत्यानं पुढे आली. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे माणूस दिवसातून अर्थात २४ तासांमध्ये किती वेळा श्वास घेतो.

शरीरशास्त्र आणि जीवशास्त्राच्या अभ्यातासून या प्रश्नाची उकल होते. जिथं श्वासोच्छवासाच्या प्रक्रिये शिवाय मानवाला हयात राहणंच अशक्य असतं असं सिद्ध होतं. याच प्रक्रियेतून शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो आणि यातून शरीराला आवश्कत उर्जेची निर्मितीसुद्धा होते.

एखाद्या व्यक्तीच्या श्वसनक्रियेचा वेग त्याचं वय, आरोग्य आणि शरीरयष्ठीवर आधारित असतो. सहसा एखादी सुदृढ, प्रौढ व्यक्ती मिनिटाला १२ ते २० वेळा श्वास घेते. याचाच अर्थ २४ तासांमध्ये ही व्यक्ती १७००० ते २८८०० वेळा श्वास घेते. श्वासोच्छवासाची ही आकडेवारी मोजणं अतिशय कठीण असून, वरील आकडा सुद्धा सरासरीच्याच हिशोबानं घेण्यात आला आहे. कोणा एका व्यक्तीला कोणतीही शारीरिक समस्या असल्यास त्या व्यक्तीची श्वसन प्रक्रिया सुदृढ व्यक्ती पेक्षा वेगळी असू शकते.

दैनंदिन जीवनात आरोग्याचा समतोल राखण्यासाठी व्यायाम आणि संतुलित आहारासमवेत श्वसनक्रियेमध्ये कोणताही अडथळा न येणं ही बाबही तितकीच महत्त्वाची. श्वसनाची योग्य पद्धत आणि स्वच्छ हवा कायमच शरीरातील इंद्रियांच्या कार्यक्षमतेला सकारात्मकरित्या मदत करते. यासाठी कायमच श्वसनप्रक्रियेला सर्वतोपरि प्राधान्य दिलं जातं. श्वसनक्रियेत कोणताही व्यत्यत न येऊ देण्यासाठी ताज्या हवेत फेरफटका मारणं, प्रदूषणाच्या ठिकाणी जाणं टाळणं, जायचं झाल्यास नाका तोंडावर मास्क लावणं या उपायांचा वापर करता येऊ शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

6 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

6 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

10 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

10 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

10 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

10 तास ago