आरोग्य

किडनी स्टोन समस्या आणि काळजी

किडनी स्टोनचा त्रास खूप भयंकर आणि असह्य असतो. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी सोबतच कमी पाणी पिण्याची सवय ही देखील याचे एक मुख्य कारण आहे. किडनी स्टोन झाल्यास आहाराची योग्य काळजी घेतल्यास बऱ्याच अंशी ही समस्या सुटू शकते. मुतखड्याचा त्रास झालेल्यांनी काय काळजी घ्यावी? नेहमीच्या आहारात कोणता बदल करायला हवा? कोणते पदार्थ टाळायला हवेयत? जाणून घेऊया.

सीफूड आणि मांस: सी फूड आणि मांस खाण्याची आवड असेल, ते वेळीच सोडले पाहिजे. यासोबतच प्रथिनयुक्त पदार्थ देखील टाळावे. या पदार्था मध्ये प्युरीन नावाचे घटक आढळतात. स्टोनच्या रुग्णाच्या शरीरात प्युरीनचे प्रमाण वाढले तर शरीरात यूरिक ॲसिडची पातळी वाढू शकते. ज्यामुळे स्टोनचा आकार वाढू शकतो.

पालक: पालक भाजीचे सेवन टाळावे. या भाजीत ऑक्सलेट आढळते. पालक खाल्ल्याने ते कॅल्शियम गोळा करते आणि ते लघवी पर्यंत पोहोचू देत नाही. ज्यामुळे प्रकृती बिघडू शकते.

टोमॅटो: टोमॅटो मध्ये ऑक्सलेटचे प्रमाण भरपूर असते. किडनी स्टोन असलेल्या टोमॅटोचे सेवन अजिबात करू नये. जर टॉमेटो खात असाल तरी त्याच्या बिया नक्कीच काढा.

चॉकलेट: चॉकलेट खाणे टाळावे. कारण यामध्ये ऑक्सलेट्स असल्यामुळे स्टोनची समस्या वाढू शकते.

चहा: स्टोनचा त्रासात चहा पिणे टाळावे. चहामुळे स्टोनचा आकार वाढतो.

घ्यायची काळजी

किडनी स्टोनचे रुग्ण असाल तर पचायला जास्त वेळ जाईल अशा पदार्थांचे आहारात सेवन करू नये. मांस, मासे, कोल्ड्रिंक्स इत्यादींचे पदार्थ टाळावे. फळांमध्ये, स्ट्रॉबेरी, प्लम्स तसेच अंजीर आणि मनुका यांसारख्या सुक्या फळांचे सेवन करू नये. दही, चीज, लोणी अशा दूध नि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी करावे. कॅन केलेला सूप, नूडल्स, तळलेले पदार्थ, जंक फूड इत्यादी टाळावे. वांगी, मशरूम, फ्लॉवर सारख्या भाज्या टाळाव्यात, यामुळे स्टोनचा त्रास वाढू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

5 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

5 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

9 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

9 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

9 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

9 तास ago