आरोग्य

हिवाळ्यात रताळ खाण्याचे फायदे

हिवाळ्यात शक्यतो शरीराला उष्णता मिळवून देणारे पदार्थ अवश्य खाल्ले जातात. थंडीच्या दिवसांत रताळं, नाचणी, तीळ, साजूक तूप, आवळा, गाजर असे पदार्थ खाल्ल्याने आपल्या आरोग्याला त्याचा फायदा तर होतोच शिवाय थंडीपासून देखील बचाव केला जातो. असे गरम पदार्थ खाऊन आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते ज्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून आपले रक्षण केले जाते. थंडीच्या मोसमांत बाजारांत रताळं फार मोठ्या प्रमाणावर विकायला असतात. प्रामुख्याने हिवाळ्यात येणारे हे कंदमुळं आपण उकडवून किंवा त्यापासून वेगवेगळे पदार्थ करून खातो. रताळ्याचा किस, रताळ्याचा हलवा, शिरा, रताळ्याचे वेफर्स, कटलेट्स असे अनेक पदार्थ घरोघरी हिवाळ्यात तयार केले जातात. ‘रताळं’ हे फक्त उपवासालाच प्रामुख्याने खाल्लं जात अशी समजूत आपल्याकडे आहे. परंतु इतर वेळी देखील आपण या रताळ्याचे अनेक पौष्टिक पदार्थ तयार करून खाऊ शकतो.

पराठा बनवण्याची सोपी पद्धत 

साहित्य

१) पाणी – २ कप

२) मीठ – चवीनुसार

३) नाचणीचे पीठ – २ कप

४) पांढरे तीळ – २ ते ३ टेबलस्पून

५) रताळं – १ ते २ (रताळं उकडवून मॅश केलेल)

६) आलं – १/२ टेबलस्पून (किसलेलं आलं)

७) जिरेपूड – १/२ टेबलस्पून

८) कोथिंबीर – १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)

९) साजूक तूप – २ ते ३ टेबलस्पून

१०) हिरव्या मिरच्या – १ टेबलस्पून (बारीक चिरलेल्या)

कृती 

१) सगळ्यांत आधी एका भांडयात पाणी घेऊन ते पाणी व्यवस्थित उकळवून गरम करुन घ्यावे. या गरम पाण्यात चवीनुसार मीठ, पांढरे तीळ, साजूक तूप घालून मीठ पाण्यांत विरघळवून घ्यावे.

२) आता या गरम पाण्यांत नाचणीचे पीठ घालून ते चमच्याने हळूहळू एकजीव करुन नाचणीचे पीठ पाण्यांत कालवून घ्यावे. त्यानंतर ५ ते १० मिनिटांसाठी यावर झाकण ठेवून द्यावे.

३) ५ ते १० मिनिटानंतर हे नाचणीचे पीठ एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावे. आता नेहमीच्या कणकेप्रमाणे नाचणीचे पीठ मळून घ्यावे. नाचणीचे पीठ मळून झाल्यानंतर ते थोड्या वेळासाठी झाकून ठेवून द्यावे.

४) एक बाऊलमध्ये उकडलेलं रताळं घेऊन त्याची सालं काढून ते मॅश करून घ्यावे. मॅश करून घेतलेल्या रताळ्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेलं आलं, जिरेपूड बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून सगळे जिन्नस एकजीव करून पराठ्याचे स्टफिंग तयार करून घ्यावे.

५) आता नाचणीच्या मळून घेतलेल्या पिठाचे गोळे तयार करून ते बरोबर मधोमध दाब देत खोलगट करून त्यात रताळ्याचे स्टँफिंग भरून घ्यावे. स्टफिंग भरून झाल्यानंतर या पिठाचा परत गोल गोळा तयार करून घ्यावा.

६) आता हा स्टफिंग भरुन घेतलेला गोळा चपातीप्रमाणे नेहमीसारखा लाटून घ्यावा. गरम तव्यावर थोडेसे साजूक तूप सोडून दोन्ही बाजुंनी हा पराठा खरपूस भाजून घ्यावा.

रताळ्याचा पराठा खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम लोणचं, दही, हिरवी चटणी किंवा सॉस सोबत हा गरमागरम पराठा खाण्यासाठी सर्व्ह करावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

5 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago