आरोग्य

रोज करता ते जेवण आयुर्वेदिक कसं बनवाल, बघा सोपी पद्धत

उठण्या-बसण्यापासून ते खाण्या-पिण्यापर्यंतचे झोपण्याचे सगळे नियम सांगितले आहेत. जे फॉलो करून तुम्ही एक नॅचरल आणि हेल्दी जीवन जगू शकता. हे आयुर्वेदिक उपाय तुम्हाला निरोगी ठेवण्यासोबतच तुमचं आयुष्यही वाढवतात. आयुर्वेदात आयुर्वेदिक जेवण कसं असतं, याबाबतही सांगण्यात आलं आहे. हे आयुर्वेदिक जेवण तुमचा अनेक गंभीर आजारांपासून बचाव करू शकतं.

तुम्ही आयुर्वेदिक उपाय, आयुर्वेदिक उपचार किंवा चिकित्सेबाबत, आयुर्वेदिक औषधांबाबतही ऐकलं असेल. पण आपण जे जेवतो किंवा खातो त्याला आयुर्वेदिक कसं करावं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर प्रसिद्ध आयुर्वेडिक डॉक्टर निधी पांड्या यांनी याबाबत माहिती दिली आहे

आयुर्वेदिक जेवण बनवण्याची पद्धत…

गरम आणि मऊ जेवण…

डॉक्टरांनी सांगितलं की, जेवण नेहमीच गरम आणि मऊ केलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी अन्न पचनास मदत करणाऱ्या अग्निसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे अन्न चांगलं शिजवा, गरम ठेवा आणि मसाल्यांचा योग्य वापर करा. अन्न मुलायम किंवा नरम ठेवण्यासाठी गुड फॅटचा वापर करा.

जेवणात ६ रस…

आयुर्वेदानुसार संपूर्ण जेवण तेच असतं, ज्यात ६ रसांचा समावेश असतो. गोड, आंबट, खारट, तिखट, कडवट आणि अस्ट्रिंजेंट हे रस जेवणात महत्वाचे असतात.

कशातून मिळतील हे रस…

गोड: गोडवा तुम्हाला पोषण देणाऱ्या जेवणातून म्हणजे धान्य, कंदमूळं, कुकिंग फॅट यातून मिळेल.

आंबट: पचनक्रिया चांगली करण्यासाठी आणि पचनासाठी रस बनवण्यासाठी तुम्हाला आंबट रस लिंबू आणि लोचण्यातून मिळेल.

खारट: जेवण पचवण्यासाठी हिमालयन रॉक सॉल्ट म्हणजे सैंधव मीठ वापरू शकता.

तिखट: शरीरात जमा झालेला प्लाक तोडण्यासाठी जिरे, धणे, हळद, लवंग, तेजपत्ता यातून तिखट मिळेल.

कडू: पोट थंड ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या आणि हळदीतून कडवटपणा मिळेल.

अस्ट्रिंजेंट: जास्त झालेलं पाणी कमी करण्यासाठी आणि पचन रोखण्यासाठी हर्ब्स, डाळी आणि हळदीतून हे मिळेल.

आयुर्वेदिक जेवण: आयुर्वेदिक जेवण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. डॉक्टरांनी आयुर्वेदिक जेवणाचं एक उदाहरण दिलं. यासाठी एक धान्य, एक डाळ, काही मसाले, गुड फॅट, मीठ, लिंबू, काही हर्ब्सपासून तयार जेवण जेवू शकता.

काही रहस्य: हळदीमध्ये वर दिलेल्या लिस्टमधील शेवटचे तीन रस असतात. जे कशा एकातून मिळणं अवघड आहे.

आवळ्यामध्ये ६ पैकी ५ रस असतात, पण याचा वापर थोडा अवघड आहे.

अस्ट्रिंजेंट रसासाठी जास्त विचार करण्याची गरज नाही. कारण तो आयुर्वेदिक ताकातून मिळवता येतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

4 तास ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

11 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

11 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

1 दिवस ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago