आरोग्य

राग, संताप, आक्रस्ताळेपणा वाढलाय, ही आहेत ‘डी’ व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षण

आधी ही चिडचिड करत नव्हती, अलीकडेच अशी झाली आहे. त्याचं सध्या काय बिनसलंय माहीत नाही, एकटा एकटा असतो, गप्प गप्प राहतो, सतत अंधार करून बसतो. हिला तर रागवायला कारणच लागत नाही, राग सतत नाकाच्या शेंड्यावरच असतो. ही आणि अशी अनेक विधानं कानावर पडतात. त्यामागे पार्श्वभूमी ही केवळ परिस्थितीची वा मनस्थितीची असते असे नाही, तर शरीरातील अंतर्गत बदलसुद्धा त्यासाठी कारणीभूत ठरू शकतात, जसे की जीवनसत्त्वाची कमतरता.

शरीरासोबतच मानसिक विकासासाठी जीवनसत्त्वे खूप महत्त्वाची असतात. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे, एखादी व्यक्ती नैराश्याची शिकार होऊ शकते. तिच्या स्वभावात बदल होऊ शकतो. ती तापट अथवा शीघ्रकोपी होऊ शकते.

निरोगी शरीरासोबतच मनही निरोगी असणं खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात, त्याचप्रमाणे पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. फरक पडतो. आजकाल बहुतेक लोक डिप्रेशनचे शिकार होत आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डिप्रेशन येते.

व्हिटॅमिन ‘डी’ च्या कमतरतेमुळे नैराश्य येऊ शकते. शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होतात. आनंदी संप्रेरक, डोपामाइन आणि सेरोटोनिन वाढवण्यासाठी व्हिटॅमिन डी उपयुक्त ठरू शकते. दीर्घकाळ ही समस्या राहिली तर पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे नैराश्य येऊ शकते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, व्हिटॅमिन डी व्यतिरिक्त, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, लोह आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिडच्या कमतरतेमुळे देखील नैराश्य येऊ शकते.

व्हिटॅमिन डी कमी असल्याची लक्षणे

शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे काही लक्षणे दिसतात. ही लक्षणे ओळखून गंभीर परिस्थिती टाळता येते. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे शरीरात थकवा आणि अशक्तपणाची समस्या उद्भवते. हाडे आणि स्नायूंमध्ये वेदना होतात. जखम झाली की ती सहज बरी होत नाही. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते.

व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्याचे उपाय

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेवर मात करण्यासाठी दररोज काही वेळ उन्हात बसा. कोवळ्या उन्हात बसल्याने, फिरल्याने शरीराला आवश्यक पोषकतत्त्व मिळतात. तनाला आणि मनाला तजेला मिळतो. नैराश्य दूर होते आणि हॅप्पी हॉर्मोन्स रिलीज होतात.

सकस आहार

व्हिटॅमिन डी साठी, अंड्यातील पिवळ बलक, मासे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मशरूम इत्यादींचा आहारात समावेश करा. तरीदेखील दीर्घकाळ त्रास होत राहिला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…

2 तास ago

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

15 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

21 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

21 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

21 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

21 तास ago