आरोग्य

पोटाच्या ‘या’ ५ तक्रारींवर पुदिन्याची पाने म्हणजे वरदान

सध्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे अनेकांना पोटाशी संबंधित अनेक समस्या त्रास देतात. आपल्यापैकी बऱ्याचजणांना अपचन, गॅस, मळमळ, पोटदुखी आणि भूक न लागणे अशा पोटाच्या वेगवेगळ्या समस्या सतावतात. सतत वरचेवर पोटाशी संबंधित अशा अनेक समस्या छळू लागल्या की, आपण त्यावर उपाय म्हणून औषध घेतो. पोटाशी संबंधित अगदी लहान – सहान वाटणाऱ्या या समस्यांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते. काहीवेळा अगदी किरकोळ वाटणाऱ्या या समस्या पुढे मोठ्या गंभीर आजाराचे कारण बनू शकतात.

पोटाशी संबंधित अनेक समस्यांवर पुदिन्याची पाने रामबाण औषध मानलं जातं. यामध्ये असलेले थंडावा देणारे गुणधर्म, अँटी-बॅक्टेरियल आणि पचन सुधारणारे घटक हे पोटाच्या विविध तक्रारींवर प्रभावीपणे काम करतात. पुदिन्याची पाने ही पोटांच्या समस्येवर एक नैसर्गिक व परिणामकारक औषध ठरू शकतं. पोटाच्या अनेक तक्रारी दूर करण्यासाठी पुदिन्याची पाने योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेणे आवश्यक असते. पोटाच्या कोणत्या ५ समस्यांमध्ये पुदिना उपयुक्त आहे आणि त्याचा योग्य वापर कधी आणि कसा करायचा.

पोटाच्या कोणत्या ५ तक्रारीसाठी पुदिना उपयुक्त आहे

1) पोटातील गॅस आणि सूज कमी करण्यासाठी 

पुदिना पोटात तयार होणाऱ्या गॅसवर नियंत्रण ठेवतो. त्यामध्ये असणारे ‘मेन्थॉल’ नावाचे तत्त्व पोटातील गॅस बाहेर टाकण्यास मदत करते आणि आतड्यांच्या स्नायूंना सैल करते, ज्यामुळे पोट हलकं वाटतं. जेवणानंतर एक कप पुदिन्याची चहा प्यायल्याने मोठा आराम मिळतो. यासाठी, ४ ते ५ ताज्या पुदिन्याच्या पानांना उकळत्या पाण्यात टाका. ५ मिनिटं चांगलं उकळा. त्यानंतर थोडंसा लिंबाचा रस त्यात घाला आणि हळूहळू प्या. हा उपाय पचन सुधारतो, गॅस कमी करतो आणि पोट शांत ठेवतो.

2) अपचन कमी करण्यासाठी 

पुदिना अपचनाच्या वेगवेगळ्या लक्षणांवर जसे की पोट जड वाटणं, सतत ढेकरं येणं आणि मळमळ होणे अशा समस्यांवर प्रभावीपणे काम करते. त्यामध्ये असलेले एन्झाइम्स पचनक्रिया वेगवान करतात आणि अन्नपदार्थ व्यवस्थित पचण्यास मदत करतात. १ चमचा पुदिन्याच्या रसात १ चिमूट काळं मीठ मिसळा आणि ते साधारणपणे जेवणापूर्वी १० ते १५ मिनिटं आधी प्यावे. हा उपाय पचनक्रिया सक्रिय करतो आणि जेवणानंतर होणाऱ्या अपचनाच्या त्रासापासून सहज आराम मिळवून देतो.

3) अ‍ॅसिडिटीच्या समस्येवर फायदेशीर 

पुदिना पोटातील अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवतो आणि त्यामुळे छातीत होणाऱ्या जळजळीपासून आराम मिळतो. पुदिन्याचा थंड गुणधर्म पोटातील उष्णता शांत करते आणि पचनसंस्थेला आराम देते. ग्लासभर थंड दूध किंवा पाणी घ्या. त्यात १ चमचा ताजा पुदिन्याचा रस मिसळा आणि हळूहळू प्या. हा उपाय तात्काळ पोटाला थंडावा देतो आणि छातीत होणारी जळजळ किंवा अ‍ॅसिडिटी दूर करतो.

4) पोटदुखीसाठी फायदेशीर

पुदिना आतड्यांतील क्रॅम्प्स कमी करतो आणि पोटदुखी सारख्या समस्येवर आराम मिळवून देतो. विशेषतः महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या पोटदुखीसाठी पुदिना फायदेशीर ठरतो. १ कप कोमट पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे २ ते ३ थेंब टाका आणि ते हळूहळू प्या हा उपाय पोट हलकं करण्यास, वेदना कमी करण्यास आणि आतड्यांना आराम देण्यास मदत करतो.

5) भूक न लागणे, मळमळ होणे

जर भूक लागत नसेल किंवा सतत मळमळ वाटत असेल, तर या समस्येवर पुदिन्याची पाने फायदेशीर ठरतात. पुदिन्याचा सुगंध मेंदूला ताजेपणा देते आणि पचनासाठी आवश्यक एन्झाइम्सना सक्रिय करतो, ज्यामुळे भूक सुधारते आणि पोट हलकं वाटतं. पुदिन्याचा रस, आलं आणि लिंबाचा रस यांचा एकत्रित रस करुन सकाळी रिकाम्या पोटी प्यावा. या उपायाने नैसर्गिकरित्या भूक वाढते, तसेच मळमळ यांसारख्या लक्षणांपासूनही आराम मिळतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; रस्त्यातील दुचाकी काढण्यास सांगितल्याने सात जणांनी शेतकऱ्याला मारहाण करत कारच्या काचा फोडल्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रस्त्याच्या मध्यभागी उभी केलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन काही गुंड…

13 तास ago

अजितदादांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणणारच! जय पवारांचा निर्धार; CID तपासाचा घेतला आढावा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची…

15 तास ago

महाराष्ट्राला ‘झाडखाऊ’ मुख्यमंत्री नको! टोरंट प्रकल्पावरून हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात

‘विकासाला विरोध नाही, विनाशाला विरोध’; कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीची उद्या सपकाळ करणार पाहणी मुंबई: कर्जत-भीमाशंकर परिसरात प्रस्तावित…

15 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल! उमेश पाटील राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते, झिशान सिद्दीकींकडे मुंबईची धुरा

सुनेत्रा पवारांकडून नियुक्त्यांची घोषणा; पार्थ पवारांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या संघटनात्मक…

15 तास ago

शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींना हात लावाल तर रस्त्यावर उतरू; विजय वडेट्टीवारांचा इशारा

गडचिरोली : प्रस्तावित विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे अधिग्रहण करण्यास विरोध करत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय…

15 तास ago

शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीच्या पाण्यावरून वाद पेटला; दगड अन् कुऱ्हाडीने मारहाण…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीवरील पाण्याची मोटार बंद केल्याचा जाब विचारणे आणि…

20 तास ago