आरोग्य

रोप जम्पिंग; दररोज दोरीवरून उड्या मारा, फिट रहा

दोरीवरून उड्या मारण्याला अष्टपैलू व्यायाम म्हटले जाऊ शकते. दोरी खूप स्वस्त असून व्यायामाचे चांगले साधन आहे. ही दोरी बॅगमध्ये सहजपणे ठेवता येते. याचा कुटुंबातील सर्वजण वापर करू शकतात.यामुळे तुमची फिटनेस चांगली राहते. तसेच यामुळे शरीराचा प्रत्येक भाग सक्रिय होऊन वजन कमी करण्यात आणि फिट ठेवण्यात मदत होते. सोबतच आपल्या शरीराला चांगला आकार मिळतो. जे लोक भारी व्यायाम करणे पसंत करतात त्यांच्यासाठी दोरीवरून उड्या मारणे वॉर्म-अप व्यायामासारखे आहे. खेळाडूदेखील याचा वापर स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आणि आपली एकाग्रता वाढवण्यासाठी करतात.ही तुमच्यासाठी उत्तम कार्डियोव्हेस्क्युलर एक्सरसाइज ठरेल. तसेच हृदयासाठीही हा व्यायाम उत्तम आहे.

दोरीवरच्या उड्या

लहानपणी आपण मजेमजेत दोरीच्या उडय़ा मारतो, अगदी मित्रमैत्रिणींमध्ये दोरीच्या उडय़ा मारण्याच्या स्पर्धाही लावतो.

लहानपणी आपण मजेमजेत दोरीच्या उडय़ा मारतो, अगदी मित्रमैत्रिणींमध्ये दोरीच्या उडय़ा मारण्याच्या स्पर्धाही लावतो. मोठे झाल्यावर या व्यायामाला एक वेगळी ओळख प्राप्त होते, ती म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा व्यायाम, पण दोरीच्या उडय़ांनी खरेच वजन कमी होते का, शिवाय सगळ्यांनी हा व्यायाम केला तर चालतो का.

खूप दोरीच्या उडय़ा मारल्या की वजन कमी होते हा एक गैरसमजच आहे. दोरीवरच्या उडय़ा मारताना सर्वात जास्त व्यायाम होतो तो पोटऱ्यांच्या स्नायूंना. त्यामुळे दोरीच्या उडय़ांमुळे पोटरीचे आणि पायाचे पुढच्या बाजूचे स्नायू बळकट होतील, पण तुम्ही केवळ वजन कमी करण्यासाठी अगदी ३० मिनिटे वा ४० मिनिटे दोरीच्या उडय़ा मारल्यात तरी त्याचा त्या दृष्टीने फारसा फायदा नाही. वजन कमी करण्यासाठी दोरीच्या उडय़ांपेक्षा जलदगतीने चालण्याचा फायदा अधिक.

पोटरीचे स्नायू बळकट करणे हाच उद्देश असेल तर चवडय़ावर वर-खाली होण्याच्या व्यायामानेही ते साधते.

आपल्या घोटय़ाच्या वर ‘अकिलीज टेंडन’ नावाचा स्नायू असतो. जे लोक रोज दोरीच्या उडय़ा मारतात त्यांच्यापैकी काही जणांमध्ये रोजच्या वर-खाली उडय़ा मारल्यामुळे या टेंडनला सूज येऊ शकते. त्यात उडय़ा मारणाऱ्याचे वजन जास्त असेल तर त्रास अधिक संभवतो.

दोरी फिरवताना मनगटाची हालचालही वारंवार एकाच प्रकारे होते. त्यामुळे काहींमध्ये मनगटाच्या स्नायूलाही सूज येणे शक्य आहे.

ज्यांना गुडघ्यांची झीज सुरू झाली आहे त्यांनी हा व्यायाम शक्यतो टाळावा. तरुणांनी मात्र वॉर्मअप करताना तो केल्यास हरकत नाही.

लहान मुले लीलया दोरीच्या उडय़ा मारतात. मोठेपणी मात्र सवय नसताना एकदम दोरीच्या उडय़ा मारणे सुरू केले तर तोल जाऊन पडण्याची भीती अधिक असते.

काही जणांमध्ये दोरीच्या उडय़ांनी कमरेच्या चकतीवर ताण येऊन कमरेचे दुखणे सुरू होऊ शकते.

दोरीच्या उडय़ांमध्ये हात आणि पाय यांचा मेळ साधून उडी मारावी लागते. त्यामुळे विविध कारणांमुळे ज्यांचा तोल जातो अशांसाठी हा व्यायाम नक्कीच बरा नव्हे.

दोरीच्या उडय़ांच्या व्यायामाला असलेल्या मर्यादांमुळे फक्त आणि फक्त तेवढाच व्यायाम शक्यतो नको. पण याचा अर्थ ज्यांना दोरीच्या उडय़ा मारता येतात त्यांनी त्या मारुच नयेत असे नाही. ‘वॉर्मअप’मध्ये आपण जे विविध व्यायाम करतो- उदा. जोर काढणे, सीटअप काढणे इत्यादी. त्याबरोबरच पाच मिनिटे दोरीच्या उडय़ा हा एक व्यायाम असावा.

दोरीच्या उडय़ा मारायच्याच असतील तर शक्यतो पायात स्पोर्ट शूज घालून करा. त्याने ‘शॉक अब्सॉर्बर’सारखा परिणाम मिळतो आणि पावलावर फार ताण पडत नाही. या उडय़ा मारताना पाच मिनिटांनी एकदा थोडी विश्रांती घ्यावी. हवे असल्यास नंतर परत पाच मिनिटे दोरीच्या उडय़ा माराव्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

24 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

24 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

24 तास ago