हळदीच्या दुधाचे फायदे
अँटीइम्फ्लेमेट्री घटक:- हळदीमध्ये दाहविरोधक [अँटीइम्फ्लेमेट्री] गुण असणारा कर्क्युमिन [curcumin] नावाचा घटक असतो. त्यामुळे दुधात हळद मिसळून प्यायल्याने संधिवात, सांधेदुखी यांसारख्या दाहसंबंधित आजारावर हे पेय गुणकारी ठरू शकते.
रोगप्रतिकार शक्तीत वाढ:- हळदीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असून, त्याचा फायदा रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होत असतो. त्यामुळे दररोज हळदीचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढून, शरीर कोणत्याही संसर्ग आणि आजारांना लढण्यासाठी तयार होते.
पचन सुधारण्यास मदत:- हळद पित्ताशयाला अन्नपचनासाठी आवश्यक असणारे पित्त तयार करण्यासाठी उत्तेजित करते. त्यामुळे हळदीचे दूध हे अपचन, पोट फुगणे, गॅस यांसारख्या पचनासंबंधी समस्या दूर करण्यास मदत करू शकते.
उत्तम झोपेसाठी मदत:- कोमट दूध त्याच्या आरामदायी गुणधर्मासाठी ओळखले जाते. दूध जेव्हा हळदीसह एकत्रित केले जाते, तेव्हा शरीराला अधिक आराम मिळतो. त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास फायदा होतो.
कर्करोग प्रतिबंधक:- हळदीमध्ये असणाऱ्या कर्क्युमिनचा फायदा हा कर्करोग प्रतिबंधित करण्यासाठीही [कदाचित] फायदेशीर ठरू शकतो , असे आहारतज्ज्ञ सुषमा यांनी सांगितल्याचे द इंडियन एक्सप्रेसच्या लेखावरून समजते. कर्क्युमिनमध्ये कर्करोगाविरुद्ध लढण्याचे गुणधर्म असू शकतात, असे काही अभ्यासातून समोर आल्याचे त्या म्हणतात.
हळदी दुधाचे सेवन कुणी करू नये?
पित्ताशय समस्याग्रस्त व्यक्ती:- हळद ही पचनासाठी पित्त उत्तेजित करण्यास मदत करते. त्यामुळे पित्ताशयाच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींमध्ये पित्ताशयाच्या समस्या वाढून ते त्रासदायक ठरू शकते.
रक्त पातळ करणारी औषधे सुरू असणाऱ्या व्यक्ती:- हळदीमध्ये नैसर्गिकरीत्या रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे जे अशा प्रकारची औषधे घेत असतील, त्यांनी हळदी दुधाच्या सेवनापूर्वी डॉक्टरांचा वा वैद्यकीय सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
हळद पाणी पिण्याचे फायदे:-
आयुर्वेदात, तसेच पारंपरिक भारतीय औषधींमध्ये पाण्यात हळद मिसळून पिण्याची पद्धत चांगलीच प्रचलित आहे. हळद पाणी पिण्याचेसुद्धा फायदे असल्याचे आहारतज्ज्ञ सुषमा सांगतात.
डिटॉक्ससाठी फायदेशीर:- हळदीमध्ये ‘डिटॉक्सिफिकेशन’ गुणधर्म असल्याचे म्हटले जाते. डिटॉक्सिफिकेशनमध्ये हळद यकृत आणि शरीरातील अनावश्यक घटकांना बाहेर काढते आणि संपूर्ण शरीर आतून स्वच्छ करण्याचे काम करते.
वजन नियंत्रणास उपयुक्त:- हळदीमध्ये असणारा कर्क्युमिन हा घटक चयापचय क्रिया नियंत्रित करून, वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकतो. तसेच तो शरीराची जळजळ वा दाह कमी करतो.
त्वचेच्या आरोग्यात सुधारणा:- हळदीचे पाणी पिण्याने त्वचा तजेलदार आणि नितळ होण्यास मदत होऊ शकते. हळदीमध्ये अँटीइम्फ्लेमेट्री आणि अँटिऑक्सिडंट्स घटक असल्याने त्वचेला त्याचा फायदा होऊ शकत.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…
मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…
नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…