मुख्य बातम्या

‘शांताराम कटके हे कोण आहेत हे त्यांना दाखवुन देऊ’; रोख नक्की कोणाकडे…?

शिरुर (तेजस फडके) : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार शांताराम कटके यांनी सोमवारी (ता. ४) आपला उमेदवारी अर्ज पाठीमागे घेत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातुन माघार घेतली. परंतु ‘शांताराम कटके कोण आहेत हे त्यांना दाखवुन देऊ’ असं विधान करत ‘समजने वालो को इशारा काफी है’ या म्हणीप्रमाणे हा इशारा नक्की कोणाला दिलाय…? याचीच चर्चा शिरुर-हवेली मतदार संघात रंगली आहे.

शिरुर विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज कोण-कोण मागे घेतील. यावर बरीच राजकीय गणिते अवलंबून होती. भारतीय जनता पार्टीचे बंडखोर प्रदीप कंद, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे बंडखोर शांताराम कटके, संजय पाचंगे यांच्यासह १४ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके या दोघांची थेट समोरासमोर लढत असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार शांताराम कटके यांनी उमेदवारीचा अर्ज माघारी घेतल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘मी अनेक वर्षापासुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. अजित पवार यांच्या विचारांचा सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रसार आणि प्रचार गेल्या अनेक वर्षापासुन मी करत आहे. राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर्गत जे इच्छुक उमेदवार होते. त्यांच्यापैकी कोणालाही उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा होती. परंतु पक्षाचा कुठलाही काडीमात्र संबंध नसलेला, अजित पवार यांच्या विचारांची कास नसलेला उमेदवार आयात केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणुन मला खंत वाटली. एवढ्या दिवस राष्ट्रवादी पक्षाचा एकनिष्ठ तसेच कुठल्याही परिस्थितीत अजित पवारांची पाठ न सोडणारा मी कार्यकर्ता असताना सुद्धा माझी योग्यता पक्षाला समजली नाही याची खंत वाटते.’

शांताराम कटके यांचा पाठिंबा कोणाला…?
तुम्ही पाठिंबा कोणाला देणार…? कि महायुतीतुन बाहेर पडणार या प्रश्नाला उत्तर देताना कटके म्हणाले, ‘आम्ही कोणाला पाठिंबा द्यायचा हे माझा परिवार, माझे मित्र आणि कार्यकर्ते असे आम्ही सर्वजण मिळून ठरविणार आहोत. आत्तापर्यंत आम्ही अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाच्या ध्येय धोरणांचा प्रचार आणि प्रसार करत आलो. परंतु अचानक ज्याचा संबंध नसलेला, विकासाच कुठलाही ज्ञान नसलेला, समाजाशी कोणतीही नाळ नसलेला आणि कोणतंही कर्तृत्व नसलेला आयात उमेदवार दिल्याने मी स्वतः संभ्रमात आहे.’

अजित पवारांना वारंवार संपर्क पण…
मी अजित पवार यांना अनेकवेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण अजित दादांकडुन माझ्या संपर्काला सन्मान मिळाला नाही. एका पदाधिकाऱ्याचा मला फोन आला होता. परंतु तो माझ्या उंचीचा नाही. त्यामुळे भविष्यात शांताराम कटके हा सगळ्यांच्या ध्याना मनात राहील असेही कटके म्हणाले. त्यामुळे आता कटके नक्की काय…? भुमिका घेणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

शिरुर-हवेलीमधून ज्ञानेश्वर कटके यांच्यापुढे नेत्यांच्या नाराजीचे मोठे आव्हान!

महायुतीचे बंडखोर उमेदवार शांताराम कटके यांनी भरला अपक्ष अर्ज…

महायुतीला अखेर मुहूर्त मिळाला… अशोक पवारांच्या विरोधात माऊली कटके

शिरुर-हवेलीतुन ज्ञानेश्वर कटके प्रबळ दावेदार; महायुतीकडुन ज्ञानेश्वर कटके निवडणुकीच्या रिंगणात…?

Loading ...
शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

9 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

9 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

15 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

16 तास ago