आरोग्य

बनावट आल्याचा चहा पिण्याचे दुष्परिणाम

थंडीच्या दिवसांत आल्याची मागणी वाढते. या दिवसांत आल्याचा चहा सगळेच जण पितात. आल्याचा चहा प्यायल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. पण बाजारात मिळणारं भेसळ आलं तुमच्या शरीराचे नुकसान करू शकते. आल्याचा वापर जवळपास सर्वच घरांमध्ये केला जातो. अन्नाची चव वाढवण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. आलं खाल्ल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात.

आल्याचं सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहते. सर्दी, खोकल्याची समस्या उद्भवत नाही. वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, इम्यूनिटी वाढून हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होत. तसंच कॅन्सरचा धोका उद्भवत नाही. आल्याचे फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतील तेव्हा तुम्ही अस्सल आलं खाल. बनावट आलं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं.

बाजारात बनावट आलं विकलं जात आहे

मागणी आणि पुरवठा वाढवण्यासाठी बाजारात नकली आल्याचं प्रमाण वाढत आहे. हे आलं खऱ्या आल्याप्रमाणे दिसतं पण यात चव नसते ना वास येत. यातून कोणतेही आरोग्यदायी फायदेही मिळत नाहीत. आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार नकली आल्याचे सेवन केल्यानं आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. ज्यामुळे अपचन, अल्सर अशा समस्या उद्भवतात.

बनावट आल्यामुळे किडनी खराब होऊ शकते

बनावट आल्यातील रसायनं सल्फर, ब्लिचिंग एजेंट किंवा कृत्रिम रंग, शरीरात विष पसरवू शकतात. यामुळे लिव्हर, किडनी आणि आतड्यांवर नकारात्मक परिणाम होतो. नकली आल्याचा वापर केल्यास पोटदुखी, गॅस, अपचन यांसारखे विकार उद्भवतात. इतकंच नाही तर रॅशेज,खाज, घश्यात जळजळ यांसारखे त्रास उद्भवतात.

कॅन्सरचा धोका

दीर्घकाळ नकली आल्याचे सेवन केल्यास हानीकारक रसायनं कॅन्सरचं कारण ठरू शकतात. यातील काही रसायनांमध्ये कॅन्सरकारी घटक असतात. ज्यामुळे श्वसनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. बनावट आल्यात पोषक तत्व नसतात. ज्यामुळे इम्यून सिस्टिम कमजोर होते. नकली आल्यातील हानीकारक तत्व ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या ठोक्यांवर प्रतिकूल परिणाम करतात.

आल्याची शुद्धता कशी तपासावी

जेव्हा तुम्ही कोणत्याही भाजीच्या दुकानातून आलं घेतात तेव्हा त्याचा वास हा नेहमी तिखट असतो. नकली आल्याला कोणताही वास येत नाही. आल्याची साल काढताना सालं हाताला चिकटली किंवा त्याचा वास येत राहीला तर आलं अस्सल आहे.

पण जर आल्याला वास आला नाही तर आलं नकली आहे. आलं विकत घेताना स्वच्छ आणि चमकदार असेल तर तपासून पाहा. अनेकदा आलं डिटर्जेंट आणि एसिडने धुतलं जातं. यातील रसायनं याला चमकदार बनवतात. एसिडमध्ये भिजवल्यानं आलं विषारी होते आणि तुम्ही आजारी पडू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

13 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

13 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

14 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

18 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

18 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

19 तास ago