आरोग्य

मसाल्याच्या डब्यातील ही पिवळी सोनसळी पावडर फक्त पाण्यात मिसळून प्या

हळदीचा वापर प्रामुख्याने भारतीय घरांमध्ये होतो. याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. ज्याचा फायदा निश्चितच आरोग्याला होतो. त्यात अँटि ऑक्सिडंट्स, अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हळदीतील गुणधर्मामुळे बॅड कोलेस्टेरॉल, अपचन, ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात राहते.

मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी हळदीचे पाणी अत्यंत फायदेशीर ठरते. सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते. याशिवाय शरीरातील सूज, अपचन, कोलेस्टेरॉल यांसारख्या समस्याही दुर होतात. हळदीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे किती.

हळदीचे पाणी पिण्याचे फायदे

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फोर्मेशनच्या रिपोर्टनुसार हळदीतील सक्रिय घटक कर्क्युमिन डायबिटीसशी लढण्यास मदत करते. रोज चिमुटभर हळदीचा समावेश आहारात केल्यास शुगर लेव्हल नियंत्रणात राहू शकते.

हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

हळदीचे पाणी नियमित प्यायल्याने ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हळदीचे इन्शुलीनच्या संवेदन शीलतेवरही सकारात्मक प्रभाव असल्याचे आढळून आले आहे, ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते.

शरीरातील सूज कमी करण्यासाठी हळदीच्या पाण्याचे सेवन करावे. यातील दाहक विरोधी गुणधर्मामुळे जळजळ, हृदयरोग, अल्झायमरचा धोका कमी होतो.

खरंतर, हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे एक संयुग असते, ज्यामध्ये शक्तिशाली दाहक-विरोधी गुणधर्म असल्याचे आढळून आले आहे. हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्याने शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे जुनाट आजार हळूहळू बरे होतात.

हळदीचा वापर शतकानुशतके केला जात आहे. त्यात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवू शकतात. ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होऊ शकते.

नियमित हळदीचे पाणी प्यायल्याने पचनसंस्था सुधारण्यास, पोट फुगणे, गॅसेसचा त्रास कमी करण्यास मदत करते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

17 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

17 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

17 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

17 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

17 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

21 तास ago