आरोग्य

झोप आणि ध्यान

ध्यानात झोप का लागते, असा प्रश्न खुप जणांना पडतो. काही जण झोप आणि ध्यान एकच मानतात. ‘मला मस्त झोप लागते. काही ध्यान-बिन करण्याची गरज नाही’ असे अजब तर्क लढवून ते मोकळे होतात. झोप आणि ध्यान यात मुलभूत फरक आहे. मनुष्य काम करुन दमला, रात्री सवयीने अंथरुणावर येऊन पडला की त्याला झोप लागते. झोपेत शरीराला विश्रांती मिळते, पण मन मात्र स्वप्नावस्थेतही जागृत असते. आपण दिवसभरात जो विचार करत राहू, त्याचे गारुड स्वप्नावस्थेवर असते.

ध्यान ही मनाला विश्रांती देण्याची प्रक्रिया आहे. ध्यानावस्थेत तुम्ही मन एकाग्र करता. जेव्हा आपण एकाग्र असतो, तेव्हा मनात कोणतेही विचार येत नाहीत. विचारांची श्रृंंखला थांबवूनच आपल्याला ध्यान करायचे असते. मन हे माकडासारखे चपळ असते. त्याला अक्षरश: बांधून एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, म्हणजे ध्यान होय. ध्यानात मनाला पुर्ण विश्रांती मिळते. ह्या विश्रांतीचा परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतो. झोपेत शरीराला आराम मिळेल पण मनाला मिळतच नाही, तो आराम ध्यान केल्यावर मिळतो. शरीराचा मनाशी संबंध असतो, हे विज्ञानाने मान्य केले आहे. आयुर्वेदात तर ते आहेच. मानसिक ताणामुळे शरीराला होणारे आजार, ही एक वेगळी वैद्यकिय शाखा झाली आहे. दिवसभरात २० मिनिटे जरी ध्यान केले, तरी ७ तासांच्या झोपेने जेवढी ऊर्जा मिळते त्याच्या कैकपटीने ध्यानाने ऊर्जा मिळवता येते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

5 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

5 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

5 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

5 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

6 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

11 तास ago