कांद्यापासून होणारे काही स्वास्थ लाभ
१) बाळंत बाईने कांदा खाल्ल्यास स्तनात दुधाची वृद्धी होते.
२) खाण्यासोबत कच्चा कांदा खाणे आरोग्यदायी मानले जाते.
३) रोज कांदा सेवन केल्यास डोळ्यांच्या समस्या दूर होतात.
४) लाल कांदा सेवनामुळे निद्रानाश हि समस्या पूर्णपणे दूर केली जाते.
५) कुत्रा चावणे: कांदा बारीक करुन पिसून त्याच्यात शहद सम प्रमाणात मिळवून त्यास कुत्रा चावलेल्या जखमेवर लावतात. त्यामुळे जखम लवकर बरी होते. जैविक संक्रमण रोखले जाते.
६) कानामधील वेदना: कांद्याच्या रसात खोबरेल तेल मिळवून २-3 थेंब कानात टाकल्यास कानातील वेदना दूर होतात.
७) उष्माघात: कांद्याच्या रसाचा वापर उष्माघातावर होतो. रसास कपाळावर,पायाच्या व हाताच्या तळावर लावून कांदा रस ५० ml व शहद २ चम्मच मिळवून घेतल्यास उष्माघाताचा त्रास कमी होतो.
८) केस काळे: केस काळे राहण्यासाठी कांदा रस आंघोळीच्या पाण्यात मिळवून त्याने डोके धुतल्यास केस काळे होण्यास मदत मिळते.
९) अपचन समस्या: रोज कांदा जेवणासोबत कच्चा खावा. यामुळे अन्नपचन होते व जठराच्या कामात गती येते.पोटातील वायू व अपचन यामुळे दूर होतो. एक कांदा आगेत भाजून त्याचा गर पिसून त्यात थोड मीठ घालून पिल्यास पोटातील वायू कमी होतो.
१०) अजीर्ण: लाल कांदा कापा. त्यावर निंबू रस चोळा व खाण्यात वापरा यामुळे अजीर्ण समस्या दूर होईल. लहान मुलांना कांदा रसाच्या ५-६ थेंबात शहद मिळवून दिल्यास त्यांच्या पोटाच्या कृमिचा नाश होतो.
११) एसिडीटी: ६० ग्राम पांढरा कांदा कापून त्यात दही मिळवावे ताजे ताजे खावे. ४-५ वेळा खाल्ल्यास एसिडीटी चा त्रास होणार नाही.
१२) अतिसार व उलट्या: लहान मुलांमध्ये हगवणीच्या वेळी त्रास कमी करण्यासाठी नाभीवर लावल्यास २-3 वेळा परत लावल्यास हा त्रास कमी होतो.
१३) मूत्रपिंडातील मूतखडे: कांदा रसात गाडी साखर बारीक करून एकत्र करून उन्हात ठेवावे नंतर रोज सकाळी २ चम्मच हे मिश्रण कोमट पाण्यासोबत खावे. मूतखड्यापासून आराम मिळेल.
१४) अस्तमा: कांदा रस एका डबीत कापूस भरून त्यात ओतावा नंतर वेळोवेळी त्याचा गंध नाकाद्वारे घेत राहिल्यास अस्तमाचा त्रास कमी होतो. कांदा रसात शहद मिळवून रोज २ चम्मच घेतल्यास अस्तमा बारा होतो. कांदा रसासोबत शहद घेतल्यामुळे सर्दी व कफ कमी होतो.
१५) डोकेदुखी: उष्माघातामुळे जर डोकेदुखी होत असेल तर कांदा रस काढून डोक्यावर त्याचा लेप लावावा. तळहात पायावर लावल्यास लवकर आराम मिळतो.
१६) दातांची सुरक्षा: रोज कांदा खाल्ल्यास दातांचे दुखणे कमी होते. दात ठणकत असेल तर कांदा पेस्ट ठणकेवर ठेवावे त्यामुळे आराम मिळेल.
१७) हृदयासंबंधी विकार: खाण्यात रोज कांदा वापरला तर हृदयासंबंधी बरेच विकार दूर होतील. शरीरात रक्ताचा पुरवठा योग्य गतीत करण्यास कांदा मदत करतो.
१८) त्वचा रोगांवर लाभकारी: कांद्याची पेस्ट त्वचारोगावर लावल्यास तो रोग बारा होण्यास मदत मिळते. कांदा रस उकडून त्यास त्वचेवर लावल्यास त्वचेवरील संक्रमण दूर होतात.
१९) नाक फुटणे: कांदा फोडून प्रभावित नासिका समोर ठेवून जोरात श्वास घेतल्यास नाक फुटणे हि समस्या दूर होते.
२०) अनेमिया: कांदा रस सरळ किंवा कांदा कच्चा खाल्ल्यास शरीरात लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत मिळते.तसेच रक्ताचे प्रमाण वाढवितो.
२१) उलटी: समान मात्रेस कांदा रस व अद्रकास मिळवून शहदा सोबत घेतल्यास उलटीची समस्या दूर होते. रक्तातील शुद्धता वाढवण्यासाठी १० ग्राम साखर व १ चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पूड ५० ग्राम कांदा रसात मिळवून घेतल्यास फायदा होतो.
कांद्याचे काही प्रकार
साधारणतः कांद्याचे अनेक प्रकार भारतात आढळतात. त्यापैकी सुका पांढरा कांदा व लाल सुका कांदा हे प्रमुख प्रकार आहेत. कांदा हिरवा असतानाही खाण्या योग्य असतो.
पांढरा कांदा: हा कांदा पांढरा असतो. हा कांद्याचा प्रमुख प्रकार आहे. हा जात तिखट व तीव्र मानला जातो. हा कांदा कच्चा व शिजवून तसेच भाजूनही खाल्ला जातो. हा कांदा बरेच दिवस साठवता येतो.
लाल कांदा: हा कांदा बाहेरुन लाल गुलाबी रंगाचा असतो. हा पांढऱ्या कांद्यापेक्षा कमी उग्र व थंड असतो. या कांद्याचा वापर कच्चा खाण्यात जास्त होतो. हाही आपण सर्व प्रकारे खाऊ शकतो.
हिरवा कांदा: कांद्याचे रोपटे असते. मुळाशी कांदा व वर त्याची हिरवी पाल असते. हिवाळ्यात यास लोक खाण्यास जास्त पसंत करतात. हा पूर्णपणे ओला कांदा म्हणून ओळखला जातो. तळलेल्या पदार्थावर हा सलाद म्हणून वापरतात. कांदा जर सरळ कच्चा खाल्ला गेला तर त्याचा फायदा सरळ मिळतो. जर ह्यास शिजवून किंवा तळून खाल्ल्याने यातील पोषके टिकून राहतात.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…