आपल्या आरोग्याची काळजी हे आपण प्रथम कर्तव्य आहे. आपले आरोग्य चांगले असेल तर आपण आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकतो. आपल्या शरीराला दिवसातील काम करण्यासाठी ऊर्जेची खूप गरज असते. जी पौष्टिक आहाराशिवाय करु शकत नाही. भिजवलेले हरभरे तुमच्या पौष्टिकतेच्या कमतरतेवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात. जाणून घ्या, काळे हरभरे किती खास आहे .
सकाळच्या नाश्त्यात मूठभर काळे हरभरे तुमच्यासाठी अमृतापेक्षा कमी नाही. काळे हरभरे आपले आरोग्य निरोगी बनविण्यात आणि आपल्या शरीराला काही आवश्यक पोषक द्रव्ये पुरवण्यात मदत करु शकतात. काळा हरभरा आजपासून नाही तर अनेक वर्षापासून आपल्या सर्वांच्याच घरात वापरला जात आला आहे. काही फिटनेस प्रेमी अधिक प्रोटिन्स मिळविण्यासाठी भिजवलेले हरभरे खाणे पसंत करतात.
काळे हरभरे खाण्याचे फायदे….
१) प्रोटिन्स अन् लोहाचा सगळ्यात मोठा स्रोत: काळा हरभरा हा प्रोटिन्स आणि आयरनचा चांगला स्रोत आहे. शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन्सचे प्रमाण पूर्ण करणं मोठं आव्हान असतं. अशा वेळी भिजवलेले हरभरे प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरतात. जर तुम्ही अँनिमियाने त्रस्त असाल तर काळ्या हरभऱ्याचा आहारात समावेश करुन तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन असते, जे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्याचे काम करते.
२) लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रभावी: जर तुम्ही वजन नियंत्रित ठेवण्यासाठी डाएटिंग करत असाल तर तुमच्या आहारात काळ्या हरभऱ्याचा समावेश जरुर करावा. काळ्या हरभऱ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. याचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहतं आणि भूकही कमी होते.
३) हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर: काळे हरभरे देखील फायबरचा एक चांगला स्रोत आहे. जो कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. काळ्या हरभऱ्यामध्ये असलेले फायबर पचनसंस्था निरोगी ठेवते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित ठेवल्याने हृदयविकार होण्याचा धोकाही कमी होतो.
४) पचनसंस्थेसाठी फायदेशीर: काळ्या हरभऱ्यामध्ये भरपूर फायबर असतं, त्यामुळे ते आपल्या पचनसंस्थेसाठी देखील खूप फायदेशीर ठरतं. हे शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकू शकतं. याचे नियमित सेवन केल्यास बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांवर मात करता येते.
गडचिरोली: उद्योगांच्या माध्यमातून गडचिरोलीचा कायापालट करण्याच्या घोषणा सत्ताधाऱ्यांकडून केल्या जात असल्या, तरी जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, रस्ते,…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती…
खाजगी व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे महसूल प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह...? शिरूर (तेजस फडके): शासकीय कार्यालय म्हणजे जनतेच्या कामासाठी…
बालरंगभूमी परिषदेतर्फे ‘कै. सौ.मनीषाताई भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा’ 2026 उत्साहात संपन्न शिक्रापूर: बालरंगभूमी परिषद,…
मुंबई : पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील १३ हजार ११९…
मुंबई : “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत…