आरोग्य

मणक्याचे आजार व मणक्यातील ग्याप झिज

सांधे दुखी, गुढगे दुखी, कंबर दूखी, पाठीचे आजार, कॅल्शियम ची कमतरता, पायाला मुंग्या येणे, डोके हाताला मुंग्या येणे यासाठी रामबाण उपाय

सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्यासाठी जवस,

तीळ, आळीव, गव्हाच्या एवढा चुना, बाभळीच्या शेंगा बिया सकट वाळवून त्याचे चूर्ण तयार करा चुर्ण दोन वेळ मधा सोबत न चुकता घ्या. ३ महिन्यात गुडघेदुखी व इतर मणक्याचे सर्व आजार कायमस्वरूपी दुर होतील.

कारणे व उपचार

बदललेली जीवनशैलीमुळे आज़ 50 वर्षी च्या वरील

खूप लोकांना भेडसावणारी समस्या. चुकीच्या सवयी, व्यसन, आरोग्याकडे दुर्लक्ष.

आजाराची लक्षणे

1 हात बधिर होणे, खांद्यापासून हाताच्या बोटापर्यंत मुग्या येणे. इत्यादी लक्षणे दिसून येतात. मणक्याचा आजार झालेल्या रुग्णामध्ये कंबरेच्या किंवा मानेच्या मणक्यामधील वंगणासारखा पदार्थ कमी झाल्यामुळे दोन मणके हे एकमेकांवर घासल्याने मणक्याची झीज होऊन त्या ठिकाणी गॅप तयार होतो.किंवा मणक्यातील गादी घासली जाते.

त्यामुळे मुंग्या येतात किंवा दुखते, कंबरेत दुखणे,हाता पायांना मुग्या येणे.

2 सकाळी उठताना त्रास होणे.

3 चालताना त्रास होणे किंवा चालता न येणे.

4 पायाच्या मागील बाजूने कंबरेपर्यंत शीर दुखणे.

5 मांडी घालून खूप वेळ बसू न शकणे.

6 शौचाला बसता न येणे.

7 चक्कर येणे.

मणक्याचे आजार होण्याची कारणे

1 डोक्या खाली मोठ्या उशीचा वापर करणे खांद्यावर किंवा पाठीवर जड वजनाच्या वस्तू उचलणे.

2 खड्डे असलेल्या रस्त्यावरून सतत मोटारसायकलवरून प्रवास करणे.

3 अपघातामुळे मणक्याला इजा होणे, सतत बैठे काम करणे.

4 पोट साफ न होणे, सतत वेदनाशामक औषधी खाणे.

5 स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर हाडांना येणारा ठिसूळपणा.

6 गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे.

7 जेवणामध्ये वातदोष वाढवणारे पदार्थ अधिक असणे उदा. वांगे, बटाटे, हरभरा डाळ, वाटाणे, तळलेले पदार्थ, अति तिखट पदार्थ इ. अनेक कारणांमुळे शरीरात वात दोष वाढून दोन मणक्यातील वंगणासारखा स्निग्ध पदार्थ कमी होऊन मणक्याचे आजार उद‌्भवतात.

8 संकरीत धान्य व फवारलेले धान्य तसेच पालेभाज्या यामुळे हाडांना ठिसूळपणा येतो

मणक्यातील हाडे ठिसूळ होण्याला व्यायामाचा अभाव ,

कायमस्वरूपी ताण तणावात राहणे असे

अनेक कारणे आहेत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

9 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

9 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

9 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

9 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

9 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

9 तास ago