आरोग्य

मिरची चिरल्यावर हाताला होणारी जळजळ ‘या’ घरगुती उपायांनी लगेच थांबवा…

अनेकदा आठवडा बाजार करताना भाज्या, कोथिंबीर याबरोबर मिरच्यांचाही साठा करून ठेवला जातो. मिरच्या चांगल्या राहाव्यात म्हणून हाताने त्यांची देठं तोडून टाकली जातात. मात्र नकळतपणे तोच हात डोळ्याला लागला तर जळजळ होते. यासाठी मिरची तोडताना, चिरताना पुढे दिलेल्या सोप्या टिप्स वापरा, जेणेकरून मिरचीचा त्रास होणार नाही.

ज्यांना मसालेदार जेवण आवडते त्यांच्या घरात हिरव्या मिरचीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हिरव्या मिरचीमुळे पदार्थ झणझणीत तर होतातच, शिवाय त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वेही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. मात्र इथे आपण मिरच्यांचा वापर करताना हाताला होणारी जळजळ आणि त्यावर उपाय जाणून घेणार आहोत.

मिरची चिरल्यावर हाताला जळजळ होऊ नये म्हणून हात लगेच धुवून टाकण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तेवढ्याने जळजळ थांबत नाही. त्याला जोड म्हणून पुढील उपाय करून बघा, जेणेकरून जळजळ दूर होऊन तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

सुरीला तेल लावा…

मिरची हाताने न तोडता सुरीने तोडा आणि सुरीला तेलाचे बोट फिरवून घ्या. त्यामुळे मिरचीचा तिखट रस सुरीला लागेल पण हाताला नाही, त्यामुळे हात जळ्जळणार नाही आणि काम सुरळीत पार पडेल.

लिंबाचा रस किंवा व्हिनेगर…

मिरची कापण्यापूर्वी लिंबाच्या रसामध्ये किंवा व्हिनेगरमध्ये बोट बुडवून मग मिरची चिरावी. विशेषतः मिरचीचे लोणचे करताना मोठ्या प्रमाणात मिरच्या चिरून घ्याव्या लागतात, त्यावेळेस हा उपाय करावा.

हाताला तेल लावा…

काही जणांना सुरीला तेल लावले असता त्याचा वापर करताना अंगावर काटा येतो, अशावेळी उलट प्रक्रिया करावी, म्हणजेच सुरीला तेल लावायचे नसेल तर हाताला तेल लावून मिरची चिरून घ्यावी आणि मग हात साबणाने स्वच्छ धुवून टाकावेत.

गार पाण्यात हात बुडवून ठेवा…

मिरची चिरून झाल्यावर हाताची जळजळ होत असेल तर बर्फाचे पाणी किंवा फ्रिजमधील गार पाणी एका पसरट भांड्यात घेऊन त्यात हात बुडवून ठेवा, त्यामुळेही लवकर आराम पडेल आणि जळजळ थांबेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

1 तास ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

6 तास ago

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

23 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

1 दिवस ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

1 दिवस ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago