आरोग्य

कॉन सिंड्रोमची लक्षणे आणि उपाय

आजार वेगवेगळ्या प्रकारचे असतात, असाच एक आजार म्हणजे कॉन सिंड्रोम. ही एक अशी स्थिती आहे ज्यात शरीरात एल्डोस्टेरॉन नावाच्या हार्मोनचं प्रमाण वाढतं. या हार्मोनमुळे शरीरात सोडिअम आणि पोटॅशिअमचं संतुलन कायम ठेवण्यास मदत मिळते. पण जेव्हा याचं प्रमाण खूप जास्त वाढतं, तेव्हा याने किडनी आणि हृदयाच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो.

लक्षणे

हाय ब्लड प्रेशर होणं, डोकेदुखी, कमजोरी, सतत थकवा, लघवीमध्ये पोटॅशिअम कमी होणं आणि मांसपेशींमध्ये वेदना होणं ही याची लक्षणं आहेत.

किडनीवर दबाव: कॉन सिंड्रोममुळे किडनीवर प्रभाव पडतो. जास्त एल्डोस्टेरोनमुळे किडनी मध्ये सोडिअम वाढतं, ज्यामुळे शरीरात पाणी थांबतं आणि ब्लड प्रेशर वाढतं. यामुळे किडनीची कार्यक्षमता कमी होते आणि किडनी फेल होण्याचा धोका वाढतो.

हृदयावर प्रभाव: कॉन सिंड्रोमुळे हृदयावर ईट प्रभाव पडतो. सतत हाय ब्लड प्रेशर राहिल्याने हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. ज्यामुळे हार्ट अटॅक आणि इतर हृदयरोगांचा धोका वाढतो. पोटॅशिअम कमी झालं तर हृदयाच्या ठोक्यांमध्येही गडबड होते. जे घातक ठरू शकतं.

उपाय

कॉन सिंड्रोमवर उपचार औषधं आणि लाइफस्टाईल मध्ये काही बदल करून केला जाऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषधं घ्यावीत आणि आराम करावा. संतुलित आहार घ्यावाआणि नियमित व्यायाम करावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

3 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

7 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

7 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

7 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

7 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

8 तास ago