आरोग्य

वेलचीचे अशाप्रकारे सेवन केल्यास शरीरात दिसतील ‘हे’ आश्चर्यकारक बदल

काही गरम मसाल्यांमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे संपूर्ण आरोग्य सुधारते. असाच एक मसाला म्हणजे वेलची. जो जेवणाची चव वाढवण्यासह मिठाई, दूध आणि चहामध्येही वापरला जातो. वेलची हा केवळ एक गरम मसालाच नाही तर तो अनेक आजारांवर औषधीदेखील आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि हंगामी आजारांपासून संरक्षण करते. यातही जर वेलचीचे पाणी बनवून सेवन केल्यास त्याचे शरीरास अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात.

हिवाळा आपल्याबरोबर विविध आजारपण घेऊन येतो, या काळात पचनक्रिया मंदावते, तसेच सर्दीमुळे हैराण व्हायला होते. यावेळी तुम्ही रोज कच्च्या वेलचीचे पाणी प्यायल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. पण, वेलचीच्या पाण्याच्या सेवनाने तुमच्या शरीराला नेमके कोणते फायदे होतात आणि ते प्रत्येकासाठी खरंच फायदेशीर असतात.

कच्च्या वेलचीचे पाणी पिण्याचे फायदे

हिवाळ्यात कच्च्या वेलचीचे पाणी सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पचनक्रिया सुधारते. यामुळे गॅस आणि ब्लोटिंगची समस्या नियंत्रणात राहते. हिवाळ्याच्या दिवसांत जड अन्नपदार्थ पचायला वेळ लागतो, अशावेळी वेलचीचे पाणी पिणे उपयुक्त ठरू शकते.

सर्दी, खोकल्यापासून मिळेल आराम

यासह सर्दी, खोकला यांसारख्या श्वसनविषयक समस्यांपासून आराम मिळतो, ज्यामुळे थंड दिवसांत विशेषतः वेलचीच्या पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. वेलचीच्या सेवनाने रक्ताभिसरण क्रियेला चालना मिळते. शरीर उबदार ठेवण्यास मदत होते, यामुळे थंडीच्या दिवसांत आरामदायी वाटते. या व्यतिरिक्त वेलचीच्या पाण्याच्या सेवनामुळे शरीरात जमा झालेले टॉक्सिन घटक लघवीवाटे शरीराबाहेर काढण्यास मदत होते, यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवता येते.

काही व्यक्तींना रोज वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्याने साइड इफेक्ट जाणवू शकतात. जसे की, ॲलर्जी होऊ शकते. यामुळे त्वचेवर जळजळ होण्यापासून ते ॲनाफिलेक्सिससारख्या गंभीर समस्येचा सामना करावा लागू शकतो. याच्या अतिसेवनामुळे छातीत जळजळ, अतिसार आणि मळमळ यांसह गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या जाणवू शकतात.

रक्तदाबाची समस्या होईल कमी

यामुळे काहींना रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. रक्तदाब अचानक कमी होणाऱ्या लोकांनी वेलचीचे पाणी पिणे टाळले पाहिजे. यासह अँटीकोआगुलंट्स आणि अँटीडायबेटिक औषधांचे सेवन करणाऱ्या लोकांनीही नियमित वेलचीच्या पाण्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.

कच्च्या वेलचीच्या पाण्याचे जास्तीत जास्त आरोग्यदायी फायदे मिळवण्यासाठी वेलची रात्रभर भिजवून ठेवणे ही सर्वोत्तम पद्धत आहे. यासाठी एक-दोन हिरव्या वेलची घ्या आणि त्या ठेचून एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवत ठेवा. यानंतर सकाळी ते पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या.

वेलचीमध्ये असे गुणधर्म असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते, चयापचय क्रियेला आणि डिटॉक्सिफिकेशनला चालना मिळते. वेलचीचे पाणी कोमट करून प्यायल्यास पचन आणि रक्ताभिसरणास आणखी मदत होऊ शकते, यामुळे मेटाबॉलिज्म बॉडीत जमा झालेले फॅट्स काही दिवसांत बर्न करते. विशेषतः थंडीच्या महिन्यांत हे अधिक फायदेशीर आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

1 दिवस ago