शिरूर तालुका

निमगाव म्हाळुंगी येथील माजी उपसरपंच रंजना काळे यांचे निधन

निमगाव म्हाळुंगी: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) गावच्या माजी उपसरपंच रंजना बबनराव काळे (वय ७४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी (ता. ६) निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गावामध्ये त्यांच्यावर सोमवारी (ता. ७) शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

रंजना काळे यांनी १९९० ते १९९५ यादरम्यान गावचे उपसरपंच पद भुषवले आहे. निमगाव म्हाळुंगी गावच्या विकासामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्या कार्यरत होत्या. पती बबनराव काळे यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी शेती व्यवसाय सांभाळला. शेती व्यवसायात त्या शेवटपर्यंत कार्यरत होत्या. अचानक जाण्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रमेश, सुरेश आणि गणेश या मुलांना त्यांनी उच्च शिक्षण दिले. रमेश हे इंडियन नेव्हीमधून सेवानिवृत्त झाले आहेत. सुरेश आणि गणेश हे उद्योग व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. पुणे शहरातील विद्यार्थी सहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद गणेश काळे यांच्याकडे आहे.

दरम्यान, मुलगा गणेश यांच्या सोबत त्या देवदर्शनाला गेल्या होत्या. परतीच्या प्रवासात असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. निमगाव म्हाळुंगी येथे गुरुवारी (ता. १०) सकाळी दशक्रिया विधी होणार आहे.

निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांची उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड!

निमगाव म्हाळुंगी येथील माजी सैनिकांनी जपला माणुसकीचा झरा…

निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचांनी गावातील युवक-युवतींना घडवले मोफत रायगड दर्शन!

निमगाव म्हाळुंगी येथे अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीची स्वच्छता करत केले वृक्षारोपण

निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांना सह्याद्रीरत्न पुरस्कार प्रदान!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago