आरोग्य

रक्ताभिसरण सुरळित राहण्यासाठी

शरिरात न थांबता एक कायम स्वरुपी वाहत असते ते म्हणजे रक्त. रक्ताभिसरण शिवाय शरिर जिवंत राहू शकत नाही. शरिराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहचवण्यासाठी, रक्ताभिसरण सुरळीत सुरू राहण्यासाठी, आहारातिल काही घटक नक्कीच मदत करू शकतात.

कोणत्याही सजिवाला जगण्यासाठी प्राणवायूची गरज असते. अर्थात केवळ ऑक्सिजन मिळून शरीर जीवंत राहिल, पण शरिराच्या विकासासाठी आवश्यक पोषक घटक हि लागतात. हे सर्व घटक आपण सेवन करतो त्या आहारातून मिळतात. शरिराला जीवनसत्त्व, प्रथिने, अँटीआॉक्सिडेंट, खनिजे, साखर, कर्बोदके आदिंची आवश्यकता असते. खाल्लेले अन्न पोटात जाते. पचनसंस्था त्यातिल विविध पोषक घटक वेगळे करते, म्हणजेच अन्नाचे पचन करते. शरीरात संचार करणारा एकमेव घटक म्हणजे रक्त. त्यासाठी रक्ताभिसरण सातत्याने होणे आवश्यक आहे. चुकीच्या आहार पद्धती, चुकिची जीवन शैली, आणि आजार यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे व्यक्तिला रक्तप्रवाह बाधित झाल्याची काही लक्षणं दिसू लागतात. तेव्हा आपण काही नैसर्गिक पद्धतीने हे अडथळे दूर करू शकतो.

टोमॅटोचे सेवन

राष्ट्रीय आरोग्य संस्थेनुसार, टोमॅटो धमन्या बंद करणाऱ्या एन्झाईमला रोखते. त्यामुळे टोमॅटो सेवन केल्यास रक्ताभिसरण चांगले राहते.

डाळिंबाचे दाणे किंवा रस

डाळिंब हे ह्रुदयरोगाच्या व रक्तदाबाच्या दोन्ही रुग्णांना चांगला आहार आहे. डाळिंबातिल पाॅलिफेनाॅल्स व नायट्रेट हे स्नायुंच्या पेशी मध्ये ऑक्सिडेशनची पत्रकारिता रोखतात. त्यामुळेच डाळींब सेवन केल्यास रक्ताभिसरण चांगले राहते.

अवाकडो चे सेवन

अवाकडो हे एक सुपर फूड आहे. रक्तप्रवाह चांगला ठेवण्यासाठी व ह्रुदयरोगापासून बचाव करण्यासाठी उत्तम फळं आहे. यांत ओमेगा ३ फॅटि ऍसिड आहे. हे आम्ल बहुतांश वेळा प्राणिज पदार्थांत मिळतं, त्यामुळे शाकाहारी व्यक्तिंना ओमेगा ३ फॅटि मिळण्यासाठी अवाकडो चे सेवन केले पाहिजे.

कांदा खाणे 

कांद्यामध्ये भरपूर अँटीआॉक्सिडेंट असतात. त्यामुळे धमन्या ब्लाॅक होणे किंवा बंद होणं रोखले जाते. रोज चार ग्रॅम कांदा सेवन केल्यास रक्ताभिसरण चांगले राहते. कांद्या मध्ये सूज कमी करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे ह्रुदयाचे आजार होत नाही.

लसुण फायदेशीर

लसणा मध्ये असिलिन असतं व त्याच बरोबर सल्फरचे प्रमाणही चांगले असते. त्यामुळे रोज लसणाचे सेवन केल्यास रक्ताभिसरण सुरळीत सुरू राहतं नि हृदयविकार होत नाही.

जीवनसत्त्व-बी

रक्ताभिसरण सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आहारात फाॅलेटचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. जीवनसत्त्व-बी मध्ये फाॅलेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तपेशी तयार होण्यात तसेच हिमोग्लोबिन चे कार्य सुरळीत होण्यासाठी मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

8 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

9 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

9 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

9 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

9 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

10 तास ago