आरोग्य

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी असा करा हळदीचा वापर

सध्या उत्सवाचं वातावरण सुरू आहे अशात तुम्ही मिठाई, चटपटीत आणि तेलकट पदार्थांच खूप सेवन करत असाल. असे पदार्थ जास्त खाल्ल्याने तुमच्या शरीरात अनेक विषारी पदार्थ जमा होऊ शकतात. यामुळे पोट, लिव्हर, आतड्या आणि किडन्यांमध्ये विषारी पदार्थ जमा होतात. जे वेळीच शरीरातून काढणं गरजेचं असतं.

शरीराचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि चांगलं कामकाज होण्यासाठी याची सफाई करणं म्हणजे शरीर डिटॉक्सीफाय करणं गरजेचं आहे. शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता.

हळद आपल्या अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी-इंफ्लामेटरी गुणांमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात मदत करते. चला जाणून घेऊ तुम्ही याचा वापर कसा करू शकता.

हळदीचं दूध: हळदीचं दूध केवळ शरीराला पोषक तत्व देण्यासाठीच नाही तर शरीर डिटॉक्सीफाय करण्यासाठीही फार चांगली आहे. हे तयार करण्यासाठी दूध हळद आणि काळ्या मिऱ्यांसोबत उकडा. ज्यामुळे याची ताकद वाढते. यानंतर यात मध मिक्स करणं विसरू नका.

डिटॉक्स वॉटर: हे सोपं करण्यासाठी यात हळदीसोबत आल्याचा वापर करा. एक मोठं काचेचं भांड घ्या आणि त्यात कोमट पाणी टाका. यात रात्रभर दालचिनीचा एक तुकडा, आल्याचा एक तुकडा, लिंबाचा तुकडा आणि पुदीन्याची पाने टाका. सकाळी हे पाणी चिमुटभर हळद टाकून उकडा. त्यानंतर हे पाणी तुम्ही दिवसभर थोडं थोडं पित रहा. याने पोट फुगणं, सूज, घशातील खवखव, फ्लू आणि अ‍ॅलर्जीसारख्या समस्या दूर होतात.

हळदीचा चहा: हा चहा तयार करण्यासाठी 1 चमचा ताजी हळद, अर्धा चमचा बारीक केलेलं आलं, 1 चमचा मध, अर्धा चमचा लिंबाचा रस, 2 कप गरम पाणी घ्या. पाणी उकडा आणि त्यात आलं व हळद टाका. हे मिश्रण उकडून घ्या आणि चहा गाळून घ्या. यात लिंबाचा रस, मध मिक्स करा. हा चहा प्यायल्याने सूज, अस्वस्थता, शरीरावरील सूज कमी करण्यास व वेदना कमी करण्यास मदत मिळते.

हळदीचे गुण आणि फायदे: हळदीमध्ये असलेलं तत्व करक्यूमिन खूप फायदेशीर असतं. करक्यूमिनमध्ये अ‍ॅंटी इंफ्लामेटरी, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी-कॅन्सर गुण असतात. हळदीमध्ये करक्यूमिनशिवाय अनेक पोषक तत्वही असतात. तसेच यात व्हिटॅमिन सी, मिनरल्स, फायबर आणि प्रोटीन भरपूर असतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

8 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago