आरोग्य

कळकट मोजे न धुता घातल्याने बेतेल जीवावर, पाहा ही सवय किती घातक

बऱ्याच लोकांना सवय असते की, ते तेच तेच कपडे न धुता पुन्हा पुन्हा वापरतात. कारण हे कपडे फार काही मळलेले किंवा खराब दिसत नाहीत. पण आपल्या कपाटात एक अशी गोष्ट असते जी न पुन्हा पुन्हा वापरल्यास त्रास होऊ शकतो. आम्ही ज्याबाबत सांगतोय ते आहेत मोजे म्हणजेच सॉक्स. दिवसभर पाय शूजमध्ये बंदिस्त असतात. ज्यामुळे घाम येतो. धूळ जमा होते आणि जेव्हा आपण शूज काढतो तेव्हा घामाच्या दुर्गंधीने डोकं गरगरतं. असं का होतं? असा प्रश्न अनेकांना पडतो.

पायांमध्ये भरपूर स्वेट ग्लॅंड असतात. घामाला स्वत:चा असा काही गंध नसतो. पण घाम आणि डेड स्किन बॅक्टेरियाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा दुर्गंधी येऊ लागते. सॉक्स घामाला शोषूण घेतात. त्या ओलावा असल्याने त्यात फंगस आणि बॅक्टेरिया वाढतात. सॉक्समध्ये भरपूर धूळ आणि इतरही अनेक कीटाणू असतात.

टी-शर्टच्या तुलनेत सॉक्समध्ये अधिक बॅक्टेरिया असतात. याचा अर्थ असा की, सॉक्स भलेही स्वच्छ दिसतात, पण त्यांमध्ये भरपूर बॅक्टेरिया आणि फंगस असतात.

मग या सॉक्समधील घाण, धूळ आणि बॅक्टेरिया केवळ पायांपर्यंत मर्यादित राहत नाहीत. ते आपला बेड, पाय, भांडी, भाज्या, सोफा घरात सगळीकडे पसरतात. असे न धुतलेले सॉक्स पुन्हा पुन्हा वापरले तर फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.

त्यामुळे न धुतलेले सॉक्स पुन्हा पुन्हा वापरू नका. भलेही ते स्वच्छ दिसत असतील. पण लपलेली घाण आणि बॅक्टेरिया दिसत नसतात. पाय रोज साबणाने धुवावे आणि कापडाने पुसा. खासकरून बोटांच्या मधली जागा कोरडी ठेवा.

सॉक्स चांगले स्वच्छ करण्यासाठी ते उलटे करून धुवावेत. सॉक्स धुण्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे गरम पाणी. याने बॅक्टेरिया आणि फंगस मरतात. जर थंड पाण्याने धुवत असाल तर सॉक्स उन्हात चांगले वाळत घाला.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago