आरोग्य

रोज अनुलोम-विलोम प्राणायाम करण्याचे फायदे काय

तुम्ही शहरात राहा किंवा खेड्यात राहा, हल्लीची जीवनशैली सपाटून बदलून गेली आहे. प्रत्येकाचं जीवन हे धकाधकीचं झालं आहे. त्यामुळेच आता शरीर आणि मनाच्या तंदुरुस्तीसाठी रोज योगा आणि प्राणायाम करणं आवश्यक झालं आहे. प्रत्येक प्राणायामाचे फायदे वेगवेगळे असतात. त्यापैकीच अत्यंत महत्त्वाचे प्राणायाम म्हणजे अनुलोम-विलोम. अनुलोम-विलोम प्राणायामाचे फायदे काय आहेत? हा प्राणायाम कधी करायचा असतो.

अनुलोम-विलोम प्राणायाम कसा करावा

अनुलोम-विलोम प्राणायाम फार कठिण नाही. हा प्राणायाम करण्यासाठी सर्वात आधी आरामदायक आसनात बसावे लागते. या प्राणायामात पाठ सरळ आणि आरामदायक ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रथम, आपल्या उजव्या अंगठ्याने उजव्या नाकाचा भाग बंद करा. नंतर, डाव्या नाकाच्या भागाने श्वास घ्या. श्वास घेतल्यावर, उजव्या नाकाने श्वास सोडून द्या. आता डाव्या नाकाचा भाग बंद करा आणि उजव्या नाकाने श्वास घ्या. यानंतर, डाव्या नाकाने श्वास सोडा. श्वास आत घेणे आणि सोडणे हे काही वेळ करा. त्यानंतर हळूहळू 15 ते 30 मिनिटांपर्यंत ते करा. हा प्राणायाम श्वास आणि शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो.

अनुलोम-विलोमचे फायदे

हृदयाचे आरोग्य: अनुलोम-विलोममुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. रक्तदाब नियंत्रणात राहणं हृदयासाठी अत्यंत फायदेशीर असतं. त्यामुळे हृदयाचे कार्य अधिक चांगले होते आणि हृदयविकाराच्या जोखमीपासून संरक्षण मिळते.

मानसिक ताण कमी होणे: दररोज अनुलोम-विलोम केल्याने मानसिक ताण कमी होतो. तणाव आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवण्यास त्याने मदत होते. त्यामुळे तुमच्या मनाची स्थिती शांत राहते. अंगी परिपक्वता येते.

पचनतंत्र सुधारते: अनुलोम-विलोम प्राणायाम पचनतंत्रासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे पचन सुधारते, गॅस, अपचन, पोट फुगणे, इत्यादी समस्या दूर होतात.

श्वासांशी संबंधित समस्यांवर कमी होणे: अनुलोम-विलोम प्राणायाम श्वास आणि श्वसन तंत्रासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे दमा, खोकला कमी होतो. हा प्राणायाम रोज केल्याने श्वासोच्छ्वासाच्या समस्या दूर होतात.

सर्दी आणि नाक जाम होणे: काही लोकांना सर्दीची समस्या असते. त्यांना नाक जाम होणे, नाकातून वास आणि गंध येणे अशा समस्या असतात. या समस्यांवर अनुलोम-विलोम प्राणायाम हा प्रभावी उपाय आहे. कारण हा प्राणायाम श्वासाच्या मार्गाला मोकळे ठेवतो आणि सर्दीमुळे होणारी नाक जाम होण्याची समस्या दूर करते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

38 मिनिटे ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

2 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

8 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

16 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

1 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

1 दिवस ago