आरोग्य

जेवणानंतर की जेवणाआधी ताक नेमके कधी प्यावे

मित्रांनो, उन्हाळा सुरु झाला की, ताक पिण्याची तीव्र इच्छा प्रत्येकाला होते. सध्या काही ठिकाणी उष्णता जाणवू लागली आहे. उष्णतेच्या लाटांमुळे देशभरातील नागरिक घामाघूम झाले आहेत, आणि या उष्णतेच्या त्रासेपासून सुटका मिळवण्यासाठी लोकं थंड पेयाचा आधार घेतात. जर आपल्याला साखरयुक्त पेय टाळायचे असेल तर, उन्हाळ्यात ताक प्या. पण बरेच जण तिन्ही वेळ किंवा कोणत्याही वेळेत ताक पितात.

ताक पिण्याचे फायदे अनेक आहेत. पण शरीराला ताकातून पौष्टीक घटक मिळावे, यासाठी कधी प्यावे? ताक, छांज, मठ्ठा अशा रुपात ताकाचे सेवन करण्यात येते. पण ताक पिण्याची योग्य पद्धत कोणती.

ताक पिण्याच्या योग्य वेळेबद्दल पोषणतज्ज्ञ आयुषी यादव सांगतात, ‘उन्हाळ्यात शरीराला पोषण यासह गारवा मिळावा, यासाठी ताक पिणे गरजेचं आहे. लंच टाईममध्ये नियमित ताक प्यायल्याने आरोग्याला फायदेच-फायदे मिळतात. शिवाय शरीराला अनेक पौष्टीक घटक मिळतात.’

दुपारी ताक पिण्याचे फायदे

पौष्टीक्तेने परिपूर्ण: ताक हे एक मिल्क ड्रिंक आहे. त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. दुपारी ताक प्यायल्याने शरीराला न्यूट्रीशनल पॉवर मिळते. ज्यामुळे दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटू लागते. शिवाय बराच काळ भूकही लागत नाही.

पचनक्रिया सुधारते: ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जसे की लैक्टोबॅसिलस आणि बिफिडोबॅक्टेरिया, जे पचन सुधारण्यास मदत करतात. हे चांगले बॅक्टेरिया आपल्या आतड्यातील वाईट बॅक्टेरिया नष्ट करतात आणि पचनक्रिया सुधारतात. अशा स्थितीत गॅस, बद्धकोष्ठता आणि इतर पोटाच्या विकारांपासून आराम मिळतो. शिवाय वजन कमी करण्यासही मदत होते.

बॉडी हायड्रेट राहते: ताकामध्ये जास्त प्रमाणात पाणी असते. ज्यामुळे आपले शरीर हायड्रेट राहते. दुपारी ताक प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राहते. यासह उन्हाळ्यात डिहायड्रेट होण्यापासून बचाव होतो.

फ्रेश आणि ताजेतवाने: ताक प्यायल्यानंतर शांतता आणि ताजेपणा जाणवतो. त्याचे थंड आणि आरामदायी गुणधर्म शरीराला शांत करते. जेव्हा मन निरोगी राहते, तेव्हा आपण दैनंदिन जीवनातील सामान्य कामे आनंदाने करतो.

जीवनसत्त्वे आणि खनिजांचा साठा: ताकामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी यांसारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजजे आढळतात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. हे घटक आपल्याला निरोगी आणि मजबूत बनवतात. यासह विविध शारीरिक प्रक्रियांमध्ये मदत करतात. त्यामुळे जेवणाआधी किंवा जेवल्यानंतर ताक जरूर प्यावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

16 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

17 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

17 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

17 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

17 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

17 तास ago